कोल्हेंच्या संस्थांवर शासकीय धाडसञ

 विवेक कोल्हे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : कोपरगावचे युवा नेते व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांच्या विविध संस्थांवर आयकर व उत्पादन शुल्क विभागासह इतर शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकायला सुरुवात केली. 

३ जून पासुन आत्तापर्यंत ३ वेळा धाडी टाकुन राञंदिवस तपासण्या करण्यात संबंधीत शासकीय यंञणांचे अधिकारी कर्मचारी दंग झाले आहेत. कोल्हे यांच्या शैक्षणिक संस्थासह सहकारी साखर कारखाना व इतर संस्थांची कसुन चौकशी करण्यात शासकीय यंञणा मग्न आहे. तालुक्यात अशा पध्दतीने आयकर विभाग व उत्पादन शुल्क विभागाने धाडी टाकण्याची हि पहीलीच वेळ आहे. 

 दरम्यान कोल्हे यांच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क व आयकर विभागाची पहीली धाड २ जून रोजी टाकण्यात आली. अनेक अधिकारी कर्मचारी यांनी संबंधीत कारखान्याचे कागदपत्रे व इतर गोष्टींची कसुन चौकशी केली. माञ त्यात त्यांना काहीच हाती लागले नाही. शिक्षक मतदार संघाची निवडणूकीत कोल्हे यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव तंत्राचा वापर म्हणून हे धाडसञ सुरू झाले.

पुन्हा ७ जूनला इतर शासकीय तपास यंञणांनी धाडी टाकायला सुरुवात केली. त्या दिवशीही शैक्षणिक संस्था व इतर संस्थांमध्ये कोणतीही तफावत आढळून आली नाही त्यामुळे विवेक कोल्हे यांना कोंडीत पकडता आले नसल्याने अखेर ११ जून रोजी राञी उशिरा पासुन ते थेट १२ जूनच्या राञी उशिरपर्यंत पुन्हा पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय तपास यंञणांनी धाडी टाकायला सुरुवात केल्या माञ हाती काहीच लागले नसल्याची माहीती पुढे आली असली तरीही. जो पर्यंत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा तिढा सुटणार नाही तो पर्यंत कोल्हे यांच्यावर सर्वतोपरी दबावतंत्राचा वापर केला जाणार अशी चर्चा तालुक्यात सुरु आहे. 

दरम्यान विवेक कोल्हे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव केल्यापासून विवेक कोल्हे हे राज्याच्या राजकारणात अधिक चर्चेत आले. तेव्हापासून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व  कोल्हे यांच्या शितयुध्द सुरु असतानाच आता नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुत विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधी पक्षाच्या उमेदवारांची झोप उडवली आहे.

अशातच कोल्हे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी व या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी शासकीय तपास यंञणांचा वापर करुन कोल्हेंना कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न आहे. माञ आपल्या संस्थांचे कामकाज अतिशय पारदर्शक असल्याने त्यांनी कितीही वेळ तपासणी केली तरी चालेल असे मत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी सांगितले. 

 दरम्यान नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेस मिळाला असला, तरी महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचे डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि विवेक कोल्हे पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे महायुतीतील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेनेला नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची जागा मिळाली असली, तरी महाविकास आघाडीतील काँग्रेसनेदेखील दिलीप पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

या राजकीय बिघाडीमुळे महायुतीचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्यासह महाविकास आघाडीचे ॲड. संदीप गुळवे या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांपुढील चिंतेत भर पडली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवश होता. दबाव टाकुनही कोल्हे यांनी माघार न घेतल्याने  महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.