कोपरगावच्या महीलांनी संकल्पातून वटपौर्णिमा केली साजरी

  कोणी वृक्षांची पुजा केली, तर कोणी वृक्षारोपन

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : वटपौर्णिमा म्हणजे  महीलांचा खास सण असतो माञ कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक महीलांनी हि वटपौर्णिमा संकल्प पौर्णिमा म्हणुन साजरी केली. काही महीलांनी आपल्या हाच पती सात जन्मोजन्मी लाभो म्हणुन वडाच्या झाडाला सातफेऱ्या मारुन पुजन करीत संकल्प केला तर काही महीलांनी आपल्या संसाराचा जोडीदार कायम स्मरणात असावा  त्यांच्या आठवणींची निशाणी पुढच्या पिढीपर्यंत दिसावी म्हणून एक वृक्ष माझ्या पतीच्या नावाचं म्हणत चक्क वृक्षारोपण केले.

केवळ वृक्षारोपण करुन थांबणार नाही तर जीवनात पतीची सेवा जशी करतो तशीच सेवा त्या लावलेल्या वृक्षांची अर्थात त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेवून पुढच्या वटपौर्णिमेला लावलेल्या रोपट्याचे विशाल वृक्षात रुपांतर करण्याचा संकल्प केला आहे. अनेक महीलांनी वृक्षारोपन करुन आपल्या पतीच्या दिर्घायुषाचा धागा रोपांच्या मुळातून जमीनीत रोवला. नटुन थटून महीलांनी वटपौर्णिमाच्या दिनी आपल्या पतीसाठी  सात जन्माची दोरी घट्ट केली तर काहींनी सात पिढ्यांना सावली देणारे वृक्ष लागवड करुन पती बरोबर  निसर्गाची सेवा  करण्याचा संकल्प करुन अनोखी वटपौर्णिमा साजरी केली.