कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : अमुक ठिकाणी चोरी झाली अशी बातमी आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आली तर आणास उत्सुकता असते ती म्हणजे किती पैसे चोरीला गेले? किती दागिणे चोरले? किंवा किती वस्तु चोरून नेल्या? याची, पण कोपरगाव येथील सवंत्सर येथे चोरांनी अजब चोरी केल्याची महिती समोर आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, संवत्सर येथील रहिवाशी सतिश भास्करराव काळे यांची संवत्सर परीसरामध्ये शेतजमीन आहे. सदर शेतजमीनीबाबत मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील अतिरीक्त जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांचे समोर संबधित दावा मिळकिती बाबत सुनावणी चालु आहे.
दरम्यान काळे यांनी या वादाची माहिती जनतेस व्हवी या उद्देशाने लोखंडी जाहीर नोटीस बोर्ड तयार करून त्यावर ‘मौजे संवत्सर येथील गट नं. 445/2 व गट नं. 445/3 या मिळकतीबाबत अतिरीक्त जिल्हाधिकारी साहेब शिर्डी यांचे समोर संबधित दावा चालु असल्याने सदर शेतजमिनीबाबत व्यवहार करू नये’ अशा मचकुराचा फलक लावला असता, चोरटयानी रात्रीतुन सदर फलक चोरून नेल्याचा तक्रार अर्ज काळे यांनी कोपरगाव शहर पोलीसांना दिला असुन संबिधत गुन्हेगारावर कारवाई करण्याची विनंती त्यांनी केली आहे. या अजब चोरीची गावात चांगलीच चर्चा रंगली आहे.