शांततेत मतदान प्रक्रिया पुर्ण, शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६ : नाशिक शिक्षक मतदार संघाचे मतदान आज झाले त्यात कोपरगाव तालुक्यात एकुण २१६८ पैकी २०२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ९३.५८ टक्के मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपाधिक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी सर्व यंञणा सतर्क ठेवत मतदान शांततेत पुर्ण केले.
दरम्यान कोपरगाव तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्रात मतदान पार पडले झालेले मतदान बुथ निहाय पुढील प्रमाणे बुध क्रमांक ७८ मध्ये एकुण मतदार १०८६ पैकी पुरुष ७०७, स्ञी ३७९ पैकी ९९६ मतदारांनी मतदान केले. पुरुष ६४८, स्ञी ३४८ अर्थात ९१.५२ टक्के मतदान. बुथ क्रमांक ७७ मध्ये एकुण मतदार १०८२ पुरुष ६९०, स्ञी ३९२ पैकी १०३३ मतदारांनी मतदान केले त्यात पुरुष ६५६, स्ञी ३७७ अर्थात टक्के मतदान झाले.
दरम्यान विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी कोपरगाव मतदान केंद्रातील दोन बूथवर ९३.५८ टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्र प्रमुख तथा तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली. तालुक्यातील शिक्षक मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रावर रांगा लावत उस्फुर्तपणे विक्रमी मतदान केले. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे होम ग्राउंड असल्याने तालुक्यातून कोल्हे यांना पहिल्या पसंतीचे मोठे मताधिक्य मिळेल का हे येत्या एक जुलै रोजी निकालानंतर स्पष्ट होईल. या निवडणुकीत तब्बल २१ उमेदवार आपले नशीब अजमावत आहे.
तहसीलदार कार्यालय येथे दोन मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडली. तहसील कार्यालयाच्या बाहेर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे, महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासह अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे स्वतंत्र बूथ मतदारांच्या मदतीसाठी उभारण्यात आले होते.
आमदार आशुतोष काळे, आमदार नरेंद्र दराडे हे कोपरगाव येथे दिवसभर ठाण मांडून होते. तर उमेदवार विवेक कोल्हे व आमदार काळे यांचे कार्यकर्ते दिवसभर बुथवर बसुन देखरेख करीत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत २३.३८ टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत ४३.४७ टक्के मतदान तालुक्यात पार पडले होते.
नाशिक शिक्षक मतदार संघात यावेळी इतिहास घडणार असून माझा विजय निश्चित आहे. शिक्षक बंधू माझ्या मागे उभे राहिल्याने मोठ्या मतांनी मी निवडणून येईल. विरोधकांना कुठलाही मुद्दा मिळाला नसल्याने त्यांनी बिनबुडाचे आरोप केले. शासकीय यंत्रणेचा सातत्याने वापर केला गेला. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात असून शिक्षक बंधू विरोधकांना मतदानातूनच उत्तर देतील. – विवेक कोल्हे, अपक्ष उमेदवार, नाशिक शिक्षक मतदार संघ