शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेत पै. माऊली जमदाडे यांना मानाची गदा

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१७ : शेवगाव जिल्ह्यात अनेक नामवंत खेळाडू घडविले आहेत. खेळात सातत्य जिद्द व मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर निश्चित यश मिळते. खेळामुळे तरुणांमध्ये खेळाडू वृत्ती जोपासण्यास मदत मिळते. पालकांनी पाल्याला आवडत्या क्षेत्रात करिअर करू द्यावे. असे सागून तरुणांनी इंटरनेटच्या मायाजालात न गुरफारता शरीरयष्टी व आरोग्य ठणठणीत ठेवण्यावर लक्ष देण्याचे आवाहन ज्ञानेशरचे चेअरमन आमदार नरेंद्र घुले यांनी केले.

Mypage

माजी आ. चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर कारखान्याचे जेष्ठ संचालक पंडितराव भोसले व त्यांचे सुपुत्र युवराज, अभिजीत, पृथ्वीराज यांच्या एबी फिटनेस क्लबच्या वतीने शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

Mypage

यावेळी जवळपास १३० नामवंत पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत कुस्त्या सुरू होत्या. शेवगाव केसरीसाठी पै. माऊली जमदाडे व सोनू कुमार यांच्यातील प्रेक्षणीय लढतीत पै. माऊली जमदाडे अजिंक्य विजय ठरला. त्याचा रोख रक्कम व मानाची गदा देऊन सन्मान करण्यात आला.

Mypage

विलास डोईफोडे व मनीष दहिया यांच्यातील प्रेक्षणीय लढतीत विलास डोईफोडे यांनी बाजी मारली. योगेश पवार व बंटी सिंग यांच्यातील सामन्यात योगेश पवार अजिंक्य ठरला. त्याचाही रोख व मानाची चांदीची गदा व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

Mypage

ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, उपसभापती गणेश खंबरे, संचालक हनुमान पाचकळ, राजेंद्र दौंड, नाना मडके, रामनाथ राजपुरे, संजय फडके आदींसह परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

क्रीडा संकुलाच्या परिसरात पार पडलेल्या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होती. त्यासाठी भव्य कुस्ती मैदान मातीचा आखाडा व मॅट उभारण्यात आले होते. उत्तम आसन व्यवस्थेमुळे सर्वांना कुस्त्या सहजपणे पहाता आल्या.

Mypage

रोहित पाटील, तुषार आव्हाड, कौशल ढवळे, शुभम जाधव आदी राष्ट्रीय पंचांनी पंच म्हणून कामगिरी बजावली. संजय भुसारी दीपक कुसळकर यांच्यासह कुस्ती अभ्यासक छगन पानसरे यांनी उत्तम सूत्रसंचालन केले. 

Mypage