आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर – देवेंद्र फडणवीस

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : राज्याच्या सत्ता संघर्षात दररोज होणाऱ्या घडामोडी अतिशय गतिमान आहेत. कधी कोणाची खुर्ची जाईल आणि कोणाची खुर्ची कोणाला भेटेल हे सांगता येत नाही. विरोधात असलेला पक्ष एका राञीत कधी सत्तेत आला हे कळतच नाही.

आज इथे तर उद्या कुठे अशी अवस्था राजकीय पक्षांची व त्या त्या राजकीय पक्षातील आमदार खासदारांची झाली आहे. शिवसेनेची फाटाफुट होवून शिवसेनेचे उभे दोन गट झाले आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

विरोधी पक्षनेते म्हणुन काम करणारे अजित पवार अचानक भाजपशी हातमिळवणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारासह सत्तेत सामील झाले. अजित पवार सत्ताधारी गटांशी जुळवून घेतल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद कधी खाली होईल आणि दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोण मुख्यमंत्री होईल अशा चर्चा दररोज होत आहेत.

यावर खुद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळ परिसरात शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या वेळी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची नजर मुख्यमंञ्यांच्या खुर्चीकडे आहे.

 विरोधक दिवसा स्वप्न पहात आहेत की, सरकार कधी पडेल किंवा बदल कधी होईल यावरून फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत बोलताना म्हणाले की, 

माझ्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नजर मुख्यमंञ्यांच्या खुर्चीवर आहे. हे मी मान्य करतो. पण ती नजर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीचे रक्षण करण्यासाठी आहे.

जर कोणी आमच्या मुख्यमंञ्यांकडे वाकड्या नजरेने पाहीले तर त्याला त्याची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोन उपमुख्यमंत्री करतोय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेचे कार्य कृतीतून करतात.

आता आम्ही तिघे एकञ आलोय, त्यामुळे आमची ताकत अधिक वाढली आहे. असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत मुख्यमंत्री पदावर आपली नजर आहे. माञ खुर्चीच्या रक्षणासाठी आमची नजर आहे. अशी गुगली टाकुन विरोधकांचा समाचार घेतला.