शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : श्री क्षेत्र पैठण येथील शांतीब्रंम्ह संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे २८ जुन रोजी पैठण येथुन पंढरपुरकडे जाण्यासाठी प्रस्थान झाले. शनिवारी दि. २९ रोजी दुपारी १२ ला शेवगाव तालुक्यात आगमन झाले. मुंगीला नाथांच्या पालखीचे आगमन होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेवगाव पाथर्डीचे उपविभागिय अधिकारी प्रसाद मते, शेवगांवचे तहसिलदार प्रशांत सांगडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेष कदम, मंडळाधिकारी, विस्तार अधिकारी तलाठी व मुंगी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
संत एकनाथ महाराजांचे वंशज, पालखी चालक रघुनाथ बुवा गोसावी यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसाद मते, तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी फेटा, उपारणे व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी दिंडयातील हजारो भाविका वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरपुरकडे मार्गस्थ झाले.