कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी पहिल्यांदाच उमेदवारी करत असलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीतच महायुती आणि महविकास आघाडीच्या उमेवारांना घाम फोडल्याचे दिसून आले आहे. कोल्हे यांना पहिल्या फेरीत ९ हजार ३७० मते मिळाली असून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना पिछाडीवर सोडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
तर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्यापेक्षा विवेक कोल्हे केवळ १ हजाराहून ७७५ मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी करत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पहिल्या फेरीतच घाम फोडल्याचे दिसून आले. त्यानंतर आता दुसऱ्या फेरीतही कोल्हेंनी दराडे यांची आघाडी तोडत कोल्हेंच मताधिक्य वाढवत आहे.
दरम्यान दुसरी फेरीत महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी केवळ ४३८ मतांची आघाडी घेतली आहे त्यांना किशोर दराडे २२ हजार ३४५ मतं पडली तर अपक्ष विवेक कोल्हे यांना २१ हजार ९०७ मतं पडल्याने कोल्हे यांच्या मतांचा आकडा वाढत चाललाय तर महाविकास आघाडीचे डॉ. संदीप गुळवे यांना १६ हजार ८०९ मते मिळाली. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे हे आघाडीवर असले तरीही मताधिक्य कमी झाले आहे. तिसरी फेरी निर्णायक ठरणारी आहे.

