कोपरगाव शाखेत “स्टेट बँक डे” साजरा

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थापना दिनानिमित्त कोपरगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत “स्टेट बँक डे” मान्यवर पाहुणे व ग्राहकांच्या हस्ते केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बँकेच्या वतीने ग्राहक संवाद मेळावा व रक्तदान कर्तव्य सोहळा आयोजित करण्यात आला.  शाखाधिकारी संतोषकुमार नायक व अधिकाऱ्यांनी ग्राहकांचे व प्रमुख पाहुण्यांचे  गुलाबपुष्प देवून स्वागत केले.

शाखाधिकारी यांनी प्रारंभी बँकेच्या विविध योजनांची माहिती उपस्थित ग्राहकांना दिली. नायक म्हणाले, कोपरगाव तालुक्यातील ग्राहकांना उत्कृठ वसेवा देण्यासाठी आम्ही बँक अधिकारी कटिबद्ध आहे. बँकेच्या विविध योजनाचा लाभ ग्राहकांना मिळावा यासाठी अधिकारी, कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील असतात. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल कोपरगाव शाखेला आत्तापर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

स्टेट बँक डेच्या निमित्त कोपरगाव शाखेच्या  संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर यावेळी आयोजित करण्यात आले होते. रक्तदात्यांनी  रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी जेष्ठ विधिज्ञ रावसाहेब जपे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त  डॉ. अजेय गर्जे, बांधकाम व्यवसायिक प्रसाद नाईक, उद्योजक प्रशांत होन, माजी नगरसेवक दिनार कुदळे, गोदामाई प्रतिष्ठानचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे, गौतम बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, संजय उदावंत प्रीतम बंब, विधिज्ञ कैलास शिंदे बँकेचे कर्ज अधिकारी सोनू रामेंद्रकुमार, प्रसाद विसपुते, देशमुख मनोज, प्रवीण कुलकर्णी आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.