शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : आपल्या शेतातील तूर व कपासी पिकाची उपटून नासधूस करून मोठे आर्थिक नुकसान केली. याबद्दल विचारणा केल्यानंतर लाथा बुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणून तालुक्यातील बोधेगाव येथील महिला शेतकरी सोफिया फिरोज शेख यांनी स्वतःची ननंद
यांचे विरुद्ध शेवगाव पोलिसात विविध कलमान्तर्गत तक्रार नोंदविलो आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, बालमटाकळी येथील आपल्या गट नंबर १३५ मधील दीड एकर शेतीमध्ये कपाशी व तूर पिकाची पेरणी करण्यात आली असून शनिवारी ( दि .२९ ) आपले पती फिरोज शेख यांचे समवेत शेतात खुरपण करत असताना अचानक आपली भावजाई हुमेरा युनुस शेख रा.अहमदनगर यांनी आम्हाला शेतामध्ये येऊन शिवीगाळ करत दीड एकर शेतीमधील उभे असलेले कपाशी व तुरीचे पीक हे आमच्या डोळ्यादेखत उपटून फेकून दिले.
यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत हुमेरा युनूस शेख यांना आम्ही आमची कपाशी व तुर पीक का उपटले अशी विचारणा केली असता त्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून हुमेरा युनुस शेख यांचे विरोधात शेवगाव पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आम्हाला न्याय न मिळाल्यास व आमच्या शेती पिकांची झालेली नुकसान भरपाई न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही महिला शेतकरी सोफिया शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.