ढाकणे पॉलिटेक्निकचे सोळा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ :  तालुक्यातील राक्षी  येथील कै. सौ. सुनिताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये दैदिप्यमान यश संपादित केले आहे. प्रथम वर्ष अभियांत्रिकीचा निकाल ९३.६०%, द्वितीय वर्षाचा निकाल ९१.१२% तर तृतीय वर्षाचा निकाल ९३.३०% लागला असल्याची माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे यांनी दिली आहे.

प्रथम वर्षातील साक्षी  नाटकर ही विद्यार्थीनी ७६.८२% गुणांसह प्रथम आली असून द्वितीय वर्षात  महेश  आंधळे याने  ७९.१४% गुण
तर तृतीय वर्षात  तिर्थराज शेवाळे याने ७६.११% गुण मिळवून  प्रथम क्रमांक पटकावले  आहेत. १६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ३५८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तंत्रनिकेतनचा एकंदर निकाल ९२ टक्के लागला आहे.

प्रथम वर्ष सिव्हीलमध्ये राहूल सोनवणे (६९.१४%), द्वितीय वर्ष सिव्हीलमध्ये समर्थ  चालसे (७५%) तर तृतीय वर्ष सिव्हीलमध्ये  ऋत्विक बनकर  (७१.८९%) गुणांसह प्रथम आले आहेत. प्रथम वर्ष कॉम्प्युटरमध्ये साक्षी नाटकर (७६.८२%), द्वितीय वर्ष कॉम्प्युटरमध्ये  वैष्णवी कातकडे (७४.७३%) तर तृतीय वर्ष कॉम्प्युटरमध्ये शेवाळे तिर्थराज शेवाळे (७६.११%) गुणांसह प्रथम आले आहेत. प्रथम वर्ष इलेक्ट्रिकलमध्ये हिमांशु कबाडी (७१.४७%) गुणांसह प्रथम आहे.  प्रथम वर्ष मेकॅनिकलमध्ये परवेज शेख (७१.६०%), द्वितीय वर्ष मेकॅनिकलमध्ये महेश  आंधळे (७९.१४%) तर तृतीय वर्ष मेकॅनिकलमध्ये  दिपक झिरपे (७५.९५%) गुणांसह प्रथम आले आहेत.

नियमित तासिकां-प्रात्यक्षिकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे. तंत्रनिकेतनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नुकतेच संस्थेचा मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी आशिष ढंगारे याची इस्त्रोमध्ये निवड झाली आहे. तसेच बरेच विद्यार्थ्यांनी शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून संस्थेने समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेवगाव या नावाने पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम कॉलेज सुरू केले आहे. तसेच पॉलिटेक्निक साठी प्रथम व थेट द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया चालू आहे.  तरी जास्तीत जास्त विद्याथ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्राचार्य डॉ. आर. एच अत्तार यांनी केले आहे.

        संस्थेचे अध्यक्ष   एकनाथराव ढाकणे, सचिव जया राहाणे, समन्वयक प्रा. ऋषिकेश ढाकणे, प्राचार्य तथा प्रशासकीय अधिकारी डॉ. आर एच अत्तार, संगणक विभागप्रमुख प्रा. महेश मरकड, स्थापत्य विभागप्रमुख प्रा. इर्शाद पठाण, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. राजकुमार गुजर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.