हक्काचा माणुस विधानसभेत पाठवा – नरेंद्र घुले

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : हक्काचा माणुस विधानसभेत नसल्याने गेली दहा  वर्षे शेवगाव तालुका मागे गेला आहे. २०१९ ला सहकाऱ्यांना संधी दिली. त्यांच्यासाठी शेवगाव तालुक्यातुन लिडही दिले. परंतु पाथर्डी तालुक्यात दुदैवाने त्यांना अपयश आले. यामध्ये आपला दोष नाही. या जनपरिसंवाद यात्रेमध्ये आत्तापर्यंत १० गावे घेतली असुन शेवगावची १११ तर पाथर्डी तालुक्यातील ६० गावा गावापर्यंत आम्ही पोहचणार आहोत.  शेवगाव तालुक्यात सर्वत्र रस्त्याची  दुरवस्था झाली आहे. हे सर्व आमदाराच्या निष्क्रीयतेमुळे होत आहे.

जायकवाडीसाठी ७०० रुपये एकर भावाने जमिन देऊनही या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून येथील पाण्याचा प्रश्न कठिण असतांनाही गेवराई नगरपरिषदेने या भागातून पाण्याची पाईपलाईन नेली. तरीही आमदार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आता विधान सभेत आपला माणुस पाठवण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी आमदार नरेंद्र घुले यांनी केले. तालुक्यातील बोधेगाव येथील बन्नोमाँ दर्ग्यात परिवर्तन जनसंवाद यात्रेदरम्यान मंगळवार दि.९ रोजी घेण्यात आलेल्या घोंगडी बैठकित ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विजयराव घोरतळे होते.

घुले म्हणाले, सर्वसामान्यांची तहान भागावी यासाठी बोधेगाव ८ गावांची योजना करण्यात आली. परंतु नियोजनामुळे ती हातघाईला आली आहे, पुढच्या विधानसभा निवडणुकीत शेवगाव पाथर्डी हे वेगवेगळे मतदारसंघ होणार आहेत त्यामुळे आपल्या हक्काचा माणुस विधानसभेत असणे आवश्यक आहे. गाईच्या दुधाला पंजाबमध्ये लिटरला ४५, कर्नाटकात ४० रुपये दर असतांना महाराष्ट्रात फक्त ३० रुपये दर दिला जातो, कापूस, तुर अशा वेगवेगळ्या अन्नधान्यांला तर भावच नाही. हे प्रश्न आपलाच माणूस सोडवू शकणार आहे.  

  माजी सभापती  डॉ. क्षितीज घुले म्हणाले,सर्वधर्म समभावाचा आदर्श घेऊन आजपर्यंत घुले कुटुंबियांनी सर्वधर्मीय बांधवांना सोबत घेऊन समाजकारण आणि राजकारण केले असून  जातीयवाद हा आमच्या रक्तात नाही. यावेळी माजी आ. चंद्रशेखर घुले, काकासाहेब नरवडे, बन्नोमाँ यात्रा पंचकमेटीचे अध्यक्ष कुंडलिकराव घोरतळे, कृउबा समितीचे सभापती एकनाथ कसाळ, शिवाजीबापू पवार,  संजय कोळगे, विष्णु वारकड, रामजी आंधारे, भाऊराव भोंगळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल घोरतळे,उपाध्यक्ष प्रसाद पवार, बन्नुभाई शेख जयदिप घोरतळे उपस्थित होते.