कोपरगाव प्रतनिधी, दि. ११ : करंजी शिवारातील एकास तीन भवानी जबर मारहाण करून जखमी केल्याने कोपरगाव अतिरिक्त दंडाधिकारी साहेब क्र. १ यांनी आरोपी तिन्ही भावना ३ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि. ३ १ मे, २०१७ रोजी आरोपी अनिल दगडू अहिरे याने त्याच्या ताब्यातील रिक्षा चालविताना फिर्यादीच्या अल्टो गाडीला कट मारल्याने या घटनेत फिर्यादीच्या गाडीचे नुकसान झाले होते. तुझ्या गाडीचे नुकसान भरून देतो असे म्हणून आरोपी अनिल अहिरे याने फिर्यादीस नुकसान भरपाई घेण्यासाठी राजलक्ष्मी एरीगेशन येवला नका येथे दि. १ जून २०१७ येथे ये असे सांगितले.
दि. १ जून २०१७ फिर्यादी दिलेल्या पत्त्यावर गेला असता नुकसान भरपाई मागतो म्हणून आरोपी अनिल दगडू अहिरे, सुनील दगडू अहिरे व अजय दगडू अहिरे यांनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केली. यात फिर्यादी गंभीर जखमी होऊन पायाचे हाड मोडले होते. यावरून आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२६, १४१, १४३, १४७, १४८ व १४९ प्रमाणे कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.
सदर घटनेची चौकशी कोपरगाव येथील अतिरिक्त दंडाधिकारी साहेब क्र. १ न्यायाधीश एम. ए. शिलर यांचे समोर चालू होती. सदर केस मध्ये साक्षीदारांच्या साक्ष, आलेल्या पुराव्यावरून व दोन्ही बाजूचे वकिलांच्या युक्तीवाद ऐकून आरोपी अनिल दगडू अहिरे, सुनील दगडू अहिरे व अजय दगडू अहिरे या सख्या तिघा भावना ३ वर्षाची सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीचे वतीने सरकारी वकील म्हणून ॲड. प्रदिकुमार रणधीर यांनी काम पाहिले.