संजय गांधी योजनेचे ६ कोटी ७५ लाख बँकेत वर्ग – तहसीलदार सांगडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शेवगाव तालुक्यातील शासनाच्या संजय गांधी निराधार, दिव्यांग तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेच्या एकूण  २३ हजार ३९ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाचे माहे एप्रिल व मे २०२४ या दोन महिन्याचे ६ कोटी ७५ लाख ३८ हजार ६०० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार निलेश वाघमारे यांनी दिली.

तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ३ हजार ९३४, दिव्यांग योजनेचे २ हजार२३५ तर, श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेचे १४ हजार ७७० असे या तिनही योजनेचे  एकूण २३ हजार ३९ लाभार्थी आहेत.त्यांच्या बँक खात्यावर एप्रिल व मे या दोन महिन्याचे एकूण अनुदानाची रक्कम ६ कोटी ७५ लाख ३८ हजार ६०० रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

दि.४ मार्च २०२४ रोजी पार पडलेल्या समितीच्या बैठकीत नव्याने मंजूर झालेल्या एक हजार ३९६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम नजीकच्या काळात अदा केली जाणार असून त्या संदर्भातील प्रक्रिया देखील सुरू आहे तसेच  नव्याने दाखल झालेल्या प्रस्तावांना या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत छाननी करून मंजुरी देणार असल्याचे सांगडे यांनी यावेळी म्हटले आहे. योजनेचे नायब तहसीलदार वाघमारे व अव्वल कारकून शशिकांत देऊळगावकर आणि त्यांचे सहकारी या कामी उत्तम योगदान देत आहेत.