चाहत्यांनी गुलालाची उधळण करत केले स्वागत
शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : राजकीय दृष्ट्या आघाडीवर व संवेदनाशील म्हणून ख्याती पावलेल्या तालुक्यातील बहुचर्चीत पिंगेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी युवक काँगेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर मुंढे यांच्या पत्नी उज्वला तर उप सरपचपदी फरीदा चांद शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या चाहत्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
पदाधिकारी निवडीसाठी आभासी निवडणूक अधिकारी म्हणून एस. बी. लवांडे यांनी निवडणुकीचे काम पाहिले. पिंगेवाडीचे ग्रामसेवक आर. आर. राठोड यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी सरपंच पदासाठी उज्ज्वला नंदकिशोर मुंढे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी पिंगेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगल अण्णासाहेब जाधव, फरिदा चांद शेख, संगीता मच्छिन्द्र जायभाये, परविन युसूफ शेख, अतिष अंगरख, संजय तानवडे, शैलेश गर्कळ यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच उज्ज्वला नंदकिशोर मुंढे ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होत्या. नवनिर्वाचित सरपंच पदाची निवड जाहीर झाल्यानंतर उपसरपंचपदी फरिदा चांद शेख यांची निवड घोषित करण्यात आली.
केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक तानवडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष कृषीमंत्री धनंजय मुंढे यांचे नीटवर्तीय नंदकिशोर उत्तमराव मुंढे, सावली दिव्यांग संघटनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष चांद शेख, माणिक जाधव, नवनाथ घुले, महादेव हजारे, अण्णासाहेब जाधव, सतीश मुंढे, अहमद शेख, सय्यद गुरुजी, भाऊसाहेब जायभाये, सुनिल मुंढे, दत्तात्रय तानवडे, अविनाश तानवडे, महेश हजारे, रामेश्वर हजारे, संजय जाधव, सोमनाथ मोहिते, अलीम शेख, कादर शेख,
कुमार मुंढे, अनिल महाराज मुंढे, भगवान जायभाये, बंडू तांबे, असिफ शेख, गोविंद पांडुळे, क्षीरसागर, कौसर शेख, रामकिसन तानवडे, इब्राहिम शेख, समीर शेख, नारायण मुंढे, सुनिल घुले, फत्तूलाल शेख, नजीर शेख, भारत घुले, रुख्मिणी मुंढे, वंदना मुंढे, सरला मुंढे, वर्षा मुंढे, जयश्री मुंढे,दिलशान शेख, आबेदा शेख, ग्रामपंचायत कर्मचारी रमेश अंगरख, एकनाथ काकडे यांच्यासह बहुसंख्येने पिंगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितानी भत्रवान बाबा विचार मंचचे लक्ष्मण वाघ यांचे हस्ते नवनिर्वाचीत सरपंच उज्ज्वला मुंढे व उपसरपंच फरिदा शेख यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

