रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या अध्यक्षपदी लांडे, सचिव पदी वसिम

शेवगाव प्रतिनीधी, दि. २४ : रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. काकासाहेब लांडे यांची तर सचिव पदी मोहम्मद वसिम यांची निवड झाली आहे. नुतन पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ गुरूवारी ( दि. २५ ) रोजी सायंकाळी सहा वाजता ममता लॉन्स येथे होणार आहे. रोटरीचे सहप्रांतपाल पुरूषोत्तम जाधव व इनफंट इंडिया आनंदवनचे दत्ता बारगजे यांच्या प्रमुख उपस्थित नुतन पदाधिका-यांचा पदग्रहण समारंभ संपन्न होत आहे.

गेल्या नऊ वर्षांपुर्वी रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटीची स्थापना झाली होती. गेल्या नऊ वर्षात शेवगाव रोटरी क्लबने अनेक सामाजिक उपक्रम सेवाभावी वृत्तीने राबविले असून दरवर्षी नवीन पदाधिका-यांना काम करण्याची संधी रोटरीतर्फे दिली जाते. शेवगाव बसस्थानकात पाणपोई, नेत्र रूग्णालय, अल्प दरात रक्त तपासणी, ऑक्सिजन पार्क, आदर्श शिक्षकांसाठी नेशन बिल्डर पुरस्कार, शाळांसाठी वाचनालय, दिवाळी पहाट यासारखे विविध रचनात्मक उपक्रम शेवगाव रोटरी क्लबच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत.

नुतन कार्यकारिणीत खजिनदार म्हणून संतोष ढाकणे तसेच डॉ. संजय लड्डा,डॉ. गणेश चेके, भागनाथ काटे, डॉ. मयूर लांडे, डॉ.आशिष लाहोटी, डॉ. दिनेश राठी, युसूफ पठाण, मनेष बाहेती, डॉ. प्रतिक्षा बेडके, अशोक लबडे आदींचा समावेश आहे. नुतन पदाधिका-यांच्या पदग्रहण समारंभासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष मनेष बाहेती, सचिव प्रदिप बोरूडे,खजिनदार सुधाकर जावळे यांनी केले आहे.