कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : चला जाणूया नदीला या अभियानांतर्गत अविरल गोदावरी या प्रकल्पासंदर्भात वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डी यांच्या दालनात अविरल गोदावरी या प्रकल्प संदर्भात बैठक झाली सदर बैठकीत अंतरराष्ट्रीय जल पुरुष डॉ. राजेन्द्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुख्य वन सरंक्षक ऋषीकेश रंजन, उपवन सरंक्षक पंकज गर्ग, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, जिल्हापरिषद मुख्याधिकारी हे दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
सदर बैठकीत येणाऱ्या २०२७ चा प्लास्टिक मुक्त कुंभमेळा व्हावा गोदावरी नदी मलजल मुक्त व्हावी तथा ती अविरल निर्मल वाहावी आणि संपूर्ण ब्रह्मगिरी प्लास्टिक कचरा मुक्त व्हावा या विषयावर सखोल चर्चा झाली.
रविकिरण गोवेकर, सत्संग फॉउंडेशनच्या वासुकी सुंदरम, नमामि गोदा फॉउंडेशन अध्यक्ष राजेश पंडित, सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर, विजयश्री सेवा संस्थेचे मनोज साठे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, अपर्णा कोठावळे, चंद्रकिशोर पाटील, श्रीकांत जोशी आणि अर्चना जोशी मुंबई येथे बैठकीसाठी उपस्थित होते.