प्रा. आनंद पाटेकर सेट उत्तीर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि. ६ : तालुक्यातील ढोरजळगाव येथील प्रा.आनंद सुरेश पाटेकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे मार्फत दि. ७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या सेट पात्रता परीक्षेत यश मिळविले आहे.

प्रा.आनंद पाटेकर अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री मुलिकादेवी महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक असून यापुर्वी पेट परिक्षेत पात्र झाले असून नगरच्या न्यु आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, येथे पीएचडी करत आहेत. प्रा.पाटेकर यांना  प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, प्राचार्य डॉ. भास्कर घोडके, प्राचार्य डॉ. सहदेव आहेर, प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर प्रा.डाॅ. जयश्री आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. पाटेकर हे पंचायत समिती, येवला येथील गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर यांचे चिरंजीव आहेत.

या यशाबद्दल प्रा.पाटेकर यांचे  संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दीपलक्ष्मी म्हसे, ॲड. वसंतराव कापरे, बापुसाहेब भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.