संजीवनीच्या राहुल जगधनेला २७ लाखांचे पॅकेज – अमित कोल्हे                               

कोपरगांव प्संरतिनिधी, दि. १३ : जीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने वेगवेगळ्या कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करून आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित  केले जाते. याचाच परीपाक म्हणुन जस्पे टेक्नॉलॉजिज या बंगळूर स्थित कंपनीने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या राहुल कैलास जगधनेची कसुन मुलाखत घेवुन त्याची वार्षिक पॅकेज रू २७ लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे. संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ऑटोनॉमस दर्जाचे हे फलित आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोल्हे पुढे म्हणाले की, अनेक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले अभियंते मिळत नाही, तर अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळत नाही, हे वास्तव संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी  जानले. ही विसंगती दुर करण्यासाठी स्व. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०२९-२० पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आणि नामांकित उद्योगांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश  अभ्यासक्रमात केला. त्याचा चांगला परीणाम प्लेसमेंटसाठी मागील वर्षाच्या  पहिल्या ऑटोनॉमस बॅच पासुन दिसत आहे.

ग्रामिण भागातील मुला मुलींना सरकारी आस्थापना किंवा नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात, काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे, या हेतुने सुमारे ४२ वर्षांपूर्वी संजीवनी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. आज संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. कोल्हे यांची दुरदृष्टिता  सिध्द होत आहे, असे अमित कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे. संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी राहुल जगधने व राहुलचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर व इर्न्फेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले आहे.