कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७: न्यायालयाच्या एससी व एसटी उपवर्गीकरण तसेच अनुसूचित जाती जमातीच्या क्रिमीलियर निर्णयाच्या विरोधात समस्त एससी, एसटी समाजाच्या वतीने कोपरगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले तर बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी यांना देण्यात आले.
आरक्षण हा मुद्दा कोणाला हि समजलेला नाही. गरिबी हटाव नव्हे तर अस्पृश्यता निवारण करण्यासाठी, सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी सदरचे आरक्षण दिले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूची मध्ये स्पष्ट केले होते. कुठल्याही जातीला काढणे किंवा घेणे हे अधिकार संसदीय मंडळाला आहे. संसदीय मंडळाने ठराव करून ते राष्ट्रपती यांना दिल्यानंतर त्यांची अधिसूचना देतील. मात्र न्यायालायाने याबाबत आदेश दिला. डॉ.आंबेडकर यांनी सदरचे अधिकार राज्यांना देखील दिलेले नाही. त्यामुळे उपवर्गीकरणात राजकारणाचा वास येतो.
समाजात तेढ निर्माण करण्याचा यातून उद्देश दिसतो. त्यामुळे हा कायदा आम्हाला मान्य नाही. याच्या विरोधात आम्ही समाज बांधव विरोध करत राहणार तसेच बदलापूर व कलकत्ता येथील अत्याचार प्रकरणावरून जाहीर निषेध व्यक्त करीत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करुन सक्षम कायदा अंमलात आणला पाहीजेत अशी मागणी आरपीआयचे नेते जितेंद्र रणशुर यांनी केली.
यावेळी उपस्थित अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या लाक्षणिक उपोषणावेळी आरपीआयचे नेते जितेंद्र रणशुर, माजी नगरसेवक संजय कांबळे, माजी नगरसेविका मायादेवी खरे, आदीवाशी समाजाचे नेते मंगेश औताडे, बुध्दीस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय ञिभुवण, बाळासाहेब झोडगे, संपत भारुड, अशोक शिंदे, सागर आहेर, मधुकर पवार, नाना डोळस, योगेश शिंदे, शंकर घोडेराव, संजय दुशिंग राजेंद्र उशिरे, नितीन शिंदे, शंकर महाकाळे, रायभान अहिरे, राहुल रणशुर, वानखेडे सर पाईक ताई, सिमाताई बनकर, साळवे ताई, शिरसाठ ताई, समाधान मगर, रणजीत खरात, अरुण खरात, सुनिल मोकळ, गौतम घनघाव, सुरेश भालेराव आदींसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.