कोपरगावची पूररेषा बदलण्यासाठी हरकदीदारांचा समिती समोर अग्रह

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगाव शहराचा विकास आराखडा तयार करण्यासठी नगररचना विभागाने नवा आराखडा तयार केला होता त्याला. शहरातील १०८  हरकती अर्ज आले होते त्यावर नगररचना विभागाच्यावतीने एक विशेष समिती गठीत करुन बुधवारी दिवसभर समितीच्या चार प्रमुख सदस्यांसह समोर हरकतदारांच्या हरकती अर्जावर सुनावनी झाली. यामध्ये १०८ पैकी केवळ एक अर्जदार गैरहजर वगळता सर्व हरकतीदार हजर राहुन आपल्या विविध तक्रारी अर्थात हरकतीवर आपली बाजु मांडली. यात सर्वाधिक हरकती अर्ज शहराच्या पूररूषे संदर्भात होते तर इतर हरकतीदारांचे हरकती अर्ज हे शहरातील आरक्षित भूखंड, रस्ते व इतर बाबीसंदर्भात होते. 

Mypage

बुधवारी सकाळी १० वाजता पालीकेचे मुख्यखधिकारी यांच्या दालनात सुरु झाली. शासनाच्यावतीने एक समिती गठीत केले त्यामध्ये नगरचे वास्तुविशारद सागर फुलारी, नगररचनाकार सेवानिवृत्त मोहन वाणी, सहाय्यक संचालक नगररचना सेवानिवृत्त संतोष धोंगडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगररचना विभाग नगरचे जितेंद्र बाविस्कर , निकम चंद्रकांत यांच्या नियोजन समितीने कोपरगाव शहरातील हरकतीदारांच्या हरकतीची सुनावणी घेतली. समितीच्या मदतीला स्थानिक दोन अभियंता होते. सार्थक बोडके, अनिल भाबड यांचा सामावेश होता.

tml> Mypage

 १०८ हरकती अर्जावर सुनावणी झाली पुर्ण झाली असुन. झालेल्या सुनावणीच्या अधारे गठीत समिती आपला योग्य तो  अहवाल देणार येत्या काही दिवसात देणार आहे. जर हरकतीदारांना समितीचा अहवाल जर मान्य नसेल तर हरकतीदार कोर्टात जावू शकतात. हरकती घेण्याची शक्यता आहे.

Mypage

 दरम्यान कोपरगाव शहराच्या विकासाला महत्वाची बाधा पूररेषा असल्याने शहराच्या मुख्य बाजारपेठेत पूररेषा निश्चित केल्याने अनेक तांत्रिक आडचणीत कोपरगाव आडकले आहे. यामुख्य प्रश्नावर हरकतदारांनी लक्ष वेधल्याने समितींच्या सदस्यांना पूररेषा चुकीची असल्याचेसिध्द करण्यात कोपरगावकर यशस्वी होण्याची शक्यता आहे. त्यावर जलसंपदा विभागाकडून नव्याने मोजणी करुन नव्याने विकास आराखड्यावर आखणी करण्याच्या सुचना समितीच्यावतीने देण्याची शक्यता आहे.

Mypage

अनेक वर्षे एकाच ठिकाणी भूखंड आरक्षण पडले आहे त्या जागेवर गेल्या २० वर्षात कोणताही विकास झाला नाही आणि पुढील २० वर्षासाठी पुन्हा त्याच भूखंडावर आरक्षण टाकून तीजागा आडकवण्यात काहीच अर्थ नाही अशी प्रतिक्रिया कोपरगाव तालुका क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष व बांधकाम व्यवसायीक प्रसाद नाईक यांनी दै. प्रभातशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कोपरगाव शहराच्या विकास आराखड्याला आमचा विरोध नाही माञ ज्या भूखंडावर कोणताही विकास न करता केवळ कोणाच्यातरी आकसापोटी किंवा राजकीय हेव्या दाव्यासाठी आडवणुक करणे योग्य नाही. असेही नाईक म्हणाले.

Mypage

 यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासासाठी व जनतेच्या भविष्यातील कल्याणासाठी  हा विकास आराखडा तयार करण्यात आला असुन ज्या बाबीत काही ञुटी असतील तर त्या योग्य प्रकारे रितसर दूरूस्त करुन विकासाचा आराखडा तयार केला जाणार आहे. या आराखड्यातुन कोणावरही अन्याय होणार नाही. वाढत्या लोकसंख्येचा विचार करुनच शहरातील विकास योजनेचा हा आराखडा असल्याने कोणीही गेरसमज करुन घेवू नये. असेही ते म्हणाले.  अखेर नगररचा विभागाच्या समिती अहवालावर आता कोपरगावच्या विकासाचे भवितव्य विसंबून आहे. 

Mypage