शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी देवकर, तर उपाध्यक्षपदी मांजरे

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १५ : सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच बिनविरोध होवुन त्यात अध्यक्षपदी प्रगतशिल शेतकरी अंबादास कारभारी देवकर तर उपाध्यक्षपदी बाजीराव वेणुनाथ मांजरे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामदेव ठोंबळ उपस्थित होते.

              प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने केलेल्या कामगिरीचा आर्थिक आढावा घेऊन नवनिर्वाचित संचालकांनी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचा नावलौकिक राज्यात वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

            जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, खुल्या स्पर्धेचे आव्हान सहकारापुढे उभे राहिले आहे. त्यामुळे सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाला या स्पर्धेत टिकावयाचे असल्यांने काळानुरूप धोरणात बदल करून व्यावसायिक हित व शेतक-यांच्या समृध्दीसाठी बदल करणे आवश्यक असून त्यादृष्टीने पावले उचलली आहेत.

माजीमंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी जीवापाड सहकारी संस्था जोपासल्या वाढविल्या आणि शेतक-यांच्या उन्नतीसाठी त्यातुन काम केले. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षीक निवडणुक बिनविरोध करून सभासद शेतक-यांनी जो संयम दाखविला त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सर्व संचालकांचे अभिनंदन केले आहे.

           अध्यक्षपदासाठी अंबादास देवकर यांच्या नावाची सुचना माजी अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी केली तर त्यास संचालक बबनराव निकम यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी बाजीराव मांजरे यांच्या नावाची सुचना माजी उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी केली तर त्यास संचालक नानासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. बिनविरोध निवडलेल्या संचालकामध्ये सर्वश्री. रावसाहेब जयराम थोरात, राजेंद्र बाबुराव भाकरे, विठठल कारभारी कोल्हे, रामदास यादव शिंदे, शिवाजी सोपानराव कदम, चंद्रकांत दत्तात्रय देवकर, रघुनाथ नाना फटांगरे, देविदास सोपान हुडे, हिरालाल पांडुरंग गायकवाड, प्रमिला प्रभाकर बढे, ताई भागिनाथ लोंढे यांचा समावेश आहे.

या सर्व नवनिर्वाचित संचालकांसह माजी अध्यक्ष संभाजीराव गावंड, माजी उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सर्वांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना नवनिर्वाचित अध्यक्ष अंबादास देवकर म्हणाले की, मतदारसंघातील शेतक-यांच्या शेती उन्नतीसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व योजनांची अंमलबजावणी करू.

            याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वासराव महाले, आप्पासाहेब दवंगे, निवृत्ती कोळपे, त्रंबकराव सरोदे, शरद थोरात, साहेबराव रोहोम, प्रदिप नवले, साईनाथ रोहमारे, बापूसाहेब बारहाते, मच्छिंद्र टेके, अरूणराव येवले, मच्छिंद्र केकाण, शिवाजीराव वक्ते यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्यने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार व्यवस्थापक हरिभाउ गोरे यांनी मानले.