अजित पवारांनी घेतली कोल्हेंची भेट

काळेंसाठी औताडेंसह कोल्हेंचे कार्यकर्ते आले एका मंचावर 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : कोपरगाव मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांची प्रचारात आघाडी घेतली असली तरी कोल्हे उघडपणे कुठेही प्रचारात दिसत नसल्याने शंका कुशंका व्यक्त होत असताना आमदार आशुतोष काळे यांनी बुधवारी माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांचे त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून आशीर्वाद घेतल्याचा तसेच आमदार काळे यांचा सत्कार केलेला फेटा समाज माध्यमावर व्हायरल झाला तसेच गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोपरगाव येथे आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते.

या सभेला कोल्हे परिवार उपस्थित राहतील की नाही, अजित पवार त्यांच्या बद्दल काय बोलतात, पवार कोल्हेंना भेटतील की काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच खुद्द अजित पवार व आमदार आशुतोष काळे हे कोल्हे परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. कोल्हे परिवाराने  या निवडणुकीत आशुतोष काळे यांना सहकार्य करण्यासाठी आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. त्यांच्या वरिष्ठांच्या शब्दाला मान दिला असल्याने त्यांचा योग्य तो सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. 

 दरम्यान कोल्हे यांचे कार्यकर्ते आमदार काळे यांच्या विजयासाठी प्रचार सभेला हजेरी लावल्याने काळे कोल्हे यांनी या निवडणुकीत एक दिलाने एक मनाने महायुतीच्या विजयाची तयारी केल्याचे दिसत आहे तर शिंदे गटाचे अर्थात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन औताडे हे स्वत: आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार यांच्या सभेला आमदार काळे यांच्या प्रचारार्थ आल्याने आता काळेंसाठी सर्वजन एकवटल्या ने काळे यांची शक्ती वाढली आहे. 

 आता मतदार संघातील बहुतांश बडे नेते काळें साठी  एक जीवाने  एकवटले आहेत. प्रथमच मतदार संघातील मोठ्या शक्ती एका छताखाली  येवून आमदार काळेंच्या विजयासाठी एकञ आले आहेत.  अजित पवार यांनी कोल्हेंना त्यांच्या निवास स्थानी जावून भेट घेतली असता यावेळी त्यांचे कोल्हे परिवाराने पवार यांचे विशेष  स्वागत केले. यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, संजीवनी शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे,  युवा नेते विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, इशांत कोल्हे आदींनी स्वागत केले यावेळी आमदार आशुतोष काळेही उपस्थित होते.

Leave a Reply