गोदावरी नदीपाञात आढळला मृतदेह
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेली विवाहीत महीला रविवारी अचानक नदीपाञात मृत अवस्थेत आढळल्याने खुन की, आत्महत्या अशी शंका मयत महीलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीत अशी की, रविवारी दुपारी शहराजवळील गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली काही मुलं नदीतील पैसे व इतर साहित्या चाळणीतुन शोधत असताना अचानक एक महीलेचा मृतदेह पाण्यात असल्याचे लक्षात आले त्यांनी पोलीसांना यांची माहीती दिली पोलीसांनी हरवलेली महीला कोणी आहे का याची चौकशी केली असता एक २४ वर्षीय विवाहित महीला गायब असल्याचे लक्षात आले त्यावरून शोध घेवून ओळख पटवली असता शहरातील खडकी येथे वडिलांच्या घरी राहणारी वर्षा मनोहर कोकाटे या २४ वर्षीय विवाहीत महिलेचे प्रेत असल्याची खाञी महीलेच्या नातेवाईकांनी कडून झाली. माञ महीलेचा खुन की आत्महत्या अशी संभ्रमावस्थेत पोलीस व नातेवाईक आहेत.
सविस्त वृत्त असे की, वर्षा मनोहर कोकाटे वय २४ असे मृत महीलेचे माहेरकडील नाव असुन ती खडकी, कोपरगाव येथे आई वडिलांकडे राहत होती. पती नांदवत नसल्याने ती माहेरी राहत होती. गुरूवार दि. १४ नोव्हेंबर रोजी वर्षा ही खडकी येथून पायी शहरातील माधव बाग येथे सकाळी ११.०० वा. आधार कार्ड बँक खात्याला लिंक करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने वडील मनोहर कोकाटे यांना बोलावून घेतले होते. त्यानंतर ते दोघे पंजाब नॅशनल बँक येथे बँक खाते दुरुस्त करण्यासाठी गेले होते. १२.०० वाजेच्या दरम्यान बँकेतील काम आटोपल्या नंतर मनोहर कोकाटे हे त्यांचे कामासाठी गेले व मुलगी वर्षा घरी जाते असे सांगत पायी घरी खडकी येथे निघाली परंतु संध्याकाळ झाली तरी मुलगी वर्षा घरी परतलीच नाही.
दरम्यान वडील मनोहर कोकाटे यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली पण मुलगी वर्षा मिळून आली नाही. तिचा फोन देखील स्विच ऑफ होता. मुलीची वाट बघत शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११. वा. दरम्यान कोपरगाव शहर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान वर्षा हिचा दि. १८/५/२०२३ रोजी अनुप जाधव रा. शिवाजी रोड, कोपरगाव याचेशी विवाह झाला होता. परंतु तो देखील तिला दीड वर्षापासून नांदवत नव्हता त्यामुळे ती आईवडिलांकडे राहत होती. त्याबाबत त्यांची कोर्ट केसेस दाखाल आहे.
वर्षा ही शिक्षित असून तिने डी. एड पर्यंत शिक्षण पुर्ण केले होते. त्या शिक्षणाच्या आधारे ती खडकी येथील नगरपलिका शाळेत कंत्राटी पद्धतीने मुलांना शिकविण्याचे काम करीत होती. वर्षा ही मोठी असून तिची लहान बहीण नाशिक येथे पोलीस भरतीचे शिक्षण घेत आहे. तर लहान भाऊ हा देखील शिक्षण घेत आहे. वडील सेंट्रीगचे काम करतात, आई देखील मजुरीचे काम करते.
४ दिवसांपासून मुलगी बेपत्ता आसल्याने आई वडिलांचे तोंडचे पाणी पळाले होते. रविवारी दि. १७ रोजी दुपारी १.१५ वा. दरम्यान गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली एका मुलीचे प्रेत मिळाले बाबत मनोहर कोकाटे यांना कोपरगाव शहर पोलिस ठाण्यातून फोन आला ओळख पटल्यानंतर ती वर्षाचं असल्याचे समजताच वडिलाने हंभरडाच फोडला. आपल्या मुलीने आत्महत्या केली की, तीची कोणी हत्या केली असा संशय नातेवाईक व्यक्त करीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.