श्रीरामपूरच्या आमदारावर कारवाई करा – नितीन औताडे

 कोपरगावच्या औताडेंच्या नावासह फोटोचा गैरवापर आमदार कानाडेंनी केला

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : कोपरगाव येथील शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांच्या नावाचा व फोटोचा विनापरवाना वापर श्रीरामपूर येथील विद्यमान आमदार लहु कानडे यांनी केल्याने शिवसेनिकामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. 

  श्रीरामपूर विधानसभेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची  शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी, भाजप व मिञ पक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार भाऊसाहेब मल्हारी कांबळे असुन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली असली तरी विद्यमान आमदार  व राष्ट्रवादी गटाचे उमेदवार लहु नाथाजी कानडे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कोपरगावचे नेते नितीन औताडे यांना विश्वासात न घेता तसेच त्यांची कसलीही परवानगी न घेता औताडे यांचा फोटो व नावाचा वापर प्रचाराच्या बॅनरवर व प्रचार पञकावर प्रकाशक म्हणून केला आहे.

महायुतीच्या उमेदवारांना मदत करणाऱ्या जिल्हाप्रमुखांच्या नावाने तसेच फोटोंसह विरोधी उमेदवाराचा प्रचार होत असल्याचे लक्षात आल्याने शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे अशी माहीती खुद्द जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात दिली आहे. पञकात पुढे औताडे पुढे म्हणाले की, आमदार लहु कानडे यांनी माझ्या नावासह फोटोचा विनापरवाना प्रकाशक म्हणून वापर केला आहे. तरी आमदार कानडे यांच्यावर रितसर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकात केली आहे.