आशुतोष काळे फक्त आमदार नाही, नामदार हवे

राज्याच्या राजकारणातील लक्षवेधी नेता आशुतोष काळे 

  कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  आमदार आशुतोष काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील पवारांचे विश्वासू नेते आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या शब्दाला संपूर्ण कोपरगाव मतदार संघातील मतदारांनी मान देत आमदार काळे यांना विक्रमी मताने निवडून दिले. अजित पवार यांच्या शब्दाला कोपरगावकरांनी मान दिला. आता अजित पवार यांनी आशुतोष काळे यांना तितक्याच्या सन्माने नामदार करावे. यापुढे आशुतोष काळे हे केवळ आमदार म्हणून नाही तर नामदार म्हणून राज्याच्या राजकारणात कार्य करण्याची आशा समस्त कोपरगाव मतदार संघातील जनतेची आहे.

 काळे आमदार झाल्या बरोबर मतदार संघातील लाडक्या बहीणी त्यांना नामदार म्हणुन आशेने पाहु लागल्या आहे. राज्याच्या राजकारणात कोपरगावचा ठसा उमटावणारा आणि सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आशुतोष काळे आता दुसऱ्यांदा आमदार होवून राज्याच्या राजकारणातील लक्षवेधी नेता ठरले आहेत.

उच्चशिक्षित, शांत व संयमी स्वभाव असणारे आमदार आशुतोष काळे यांनी  गेल्या पाच वर्षात तीन हजार कोटींचा विक्रमी निधी आणुन मतदार संघातील विकास कामांना गती देण्याचे काम केले. उर्वरित विकास कामांसाठी नव्या योजनांचा आराखडा तयार करीत विकासाचा नवा इतिहास निर्माण करण्याची तयारी आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. कोपरगाव मतदार संघातील तुल्यबळ दोन घराने आहेत. स्व. शंकरराव काळे व स्व. शंकरराव कोल्हे यांनी राज्याच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवून राज्याच्या प्रमुख नेत्यांमध्ये आपलं नाव कोरलं होतं.

माञ मध्यंतरीच्या काही काळात पारंपारिक काळे-कोल्हे यांच्यातील लढतीत दोघांना झुलवत ठेवून राज्याच्या राजकारणातून काळे-कोल्हेंना अलगद बाजूला सारण्याचे काम काही बड्या नेत्यांनी केले होते. आता त्या बड्या नेत्यांपासुन काळे-कोल्हे काहीसे  दूर राहून राजकारणात नव्या पिढीने नवा  राजकीय डाव टाकला असुन प्रथमच काळे-कोल्हे एकञ येवून महायुतीचा धर्म पाळत आशुतोष काळेंचा विक्रमी मतांची नवी विजयाची सलामी राज्याला दिली.

आता राज्याच्या राजकारणात विक्रमी मताने विजयी झालेले आशुतोष काळे मंञी पदाचे दावेदार झाले आहेत. काळेंना विजयी करण्यासाठी मतदार संघातील सर्वांनी एकजीवाने युतीचा धर्म पाळला आता सत्ताधारी वरिष्ठ नेत्यांनी काळे कोल्हेंना दिलेला शब्द पाळला तर कोपरगाव मतदारसंघातील जनता सुखावेल आणि मतदार संघाला तालुक्यातील दोन्ही नेते वरिष्ठ  पदावर दिसतील. किंबहुना आमदार आशुतोष काळे मंञी म्हणून राज्याचं नेतृत्व करतील अशी आशा आहे. आमदार काळे यांनी मतदार संघातील  विकासासाठी अनेक गोष्टींचा त्याग करीत राजकीय वाटचाल करीत आहेत.

त्यांना कोणत्याही पदांची आशा नाही परंतु त्यांच्यातील उत्तम नेतृत्वगुणांमुळे अनेक पद चालुन आले आणि येतीलही. आमदार काळे यांनी मतदार संघातील पाटपाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला. शहराचा पिण्याच्या प्रश्न मिटवण्यासाठी पाचव्या साठवण तलावाची निर्मिती करुन पाणी प्रश्न सोडवला परंतू सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे तो सोडवण्यासाठी आमदार काळे नामदार झालेच पाहीजे. मतदार संघाला दोन मातब्बर लोकप्रतिनिधी लाभले तर विकासाला चालना मिळणार आहे. आमदार आशुतोष  काळे यांनी मतदार संघाच्या विकासा कार्यासाठी स्वताला वाहून घेतले आहे.

स्व. शंकरराव काळे यांचा वारसा जपत माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली जनकल्याणाचे कार्य करीत आहेत. आता कोपरगाव मतदार संघाचा लोकप्रतिनिधी केवळ आमदार असुन चालणार नाही तर नामदार असणे गरजेचे आहे. या मतदार संघाला गेल्या विस वर्षात मंञीपद मिळाले नाही किंवा सत्तेतील महत्वाचा वाटा मिळाला नाही. काळे परिवाराने जनहितासाठी राजकारणात अनेक गोष्टींचा त्याग केला. आता त्याच त्यागाची पावती म्हणून राज्य नेतृत्वाने काळेंना राज्यच नेतृत्व करण्याची संधी दिली तर मतदार संघाचा कायापालट अधिक होईल आणि राज्याला आदर्श नेतृत्व असलेला एक उत्तम नेता लाभेल. आमदार काळेंना अवघ्या पाच वर्षांत विकासाला गती दिली तर राज्याचं नेतृत्व मिळालं तर  ते राज्यातील जनतेसाठी अधिक कार्य करतील अशी चर्चा मतदार संघात सध्या सुरु झाली आहे.