एकनाथराव ढाकणे केंब्रिंज डिजीटल विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेटने  सन्मानित

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : तालुक्यातील राक्षी येथील ढाकणे शैक्षणिक संकूलचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांना लंडन येथील केंब्रिज डिजिटल विद्यापीठ मार्फत ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानद डॉक्टरेट पदवीने (पीएचडी ) शनिवारी (दि. २३) आयोजित विशेष कार्यक्रमात  सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान गोवा येथील विद्यापीठाच्या पदवीप्रदान दीक्षांत सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

ढाकणे यांनी सन २०१० साली केदारेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थे अंतर्गत कै. सौ. सुनीताताई एकनाथराव ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक कार्याची मूहूर्तमेढ रोवली. आज या संस्थेचा वटवृक्ष झाला आहे. २०२४ -२५  या शैक्षणिक वर्षापासून येथे समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग या नावाने पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रम तसेच सुनिताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सुरू करून त्यावर कळस चढविला आहे.

अतिशय अल्पावधीत पॉलिटेक्निक कॉलेजने ग्रामीण भागात केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी कौतूक केले आहे. ढाकणे पॉलिटेक्निक कॉलेज शेवगाव या संस्थेस  एशियन टुडे रिसर्च अँड मेडिया या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेमार्फत ‘नेशन प्राइड अवॉर्ड 2020 ‘अंतर्गत ‘ बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज इन न महाराष्ट्र ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यापूर्वीही संस्थेस नवी दिल्ली येथील ऑल इंडिया बिझनेस अँड कम्युनिटी फाउंडेशन या संस्थेमार्फत ‘शिक्षा भारती अवार्ड ‘ ह्या राष्ट्रीय पुरस्काराने हॉलंडचे उच्चायुक्त डी के बक्षी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त देखील अनेक पुरस्कार ठाकणे यांच्या खाती जमा आहेत. या कार्याची दखल घेत केंब्रिज डिजिटल विद्यापीठाने त्या ना मानद डॉक्टरेएट – पीएचडी  देऊन सन्मानित केले. त्या
बद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

  शैक्षणिक संकुलचे कार्यकारी अधिकारी प्रा. श्रीकांत ढाकणे, प्राचार्य डॉ. आर एच आत्तार,  डॉ. एडी डोंगरे, सचिव जया राहणे, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा. महेश मरकड आदींनी त्यांचा सत्कार केला.