जात पडताळणी व मतदार नोंदणीला उस्फुर्त प्रतिसाद

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र व महाविद्यालयातील नवमतदारांना मतदार नोंदणी करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अभियानास पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

कोपरगाव शहरातील ११ वी व १२ वी विज्ञान विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेऊन जात पडताळणी कार्यालय अहमदनगर यांच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने एस. एस. जी. एम. व के. जे. सोमैया महाविद्यालयात सोमवार (दि.२८) पासून जात पडताळणी सहाय्यता केंद्र व ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १ जानेवारी २०२३ रोजी वय वर्ष १८ पूर्ण होणार आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे.

हे अभियान गुरुवार (दि.०१) डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असून पहिल्याच दिवशी या अभियानाला विद्यार्थ्यानी मोठा प्रतिसाद दिला. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अभ्यास बाजूला ठेवून करावी लागणारी धावपळ वाचवून महाविद्यालयातच सुविधा उपलब्ध करून दिल्याबदल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. तसेच जानेवारी २०२३ रोजी वय वर्ष १८ पूर्ण करणाऱ्या सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी देखील महाविद्यालयातच होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणार आहे.

त्यामुळे पहिल्याच दिवशी एस. एस. जी. एम. व के. जे. सोमैया महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा या दोन्ही अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला असून अजून तीन दिवस विद्यार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेवून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते विद्यार्थ्यांना सहकार्य करीत आहे.

यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक फकीर कुरेशी, दिनकर खरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष कार्तिक सरदार, सोमनाथ आढाव, चांदभाई पठाण, मुकुंद इंगळे, रितेश राऊत, योगेश वाणी, ऋतुराज काळे, आशुतोष देशमुख, संदीप सावताडकर, मनोज नरोडे, सागर लकारे, अनिरुद्ध काळे आदी उपस्थित होते.