श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातील विद्यार्थानी अनुभवली थ्रीडी आकाशगंगेची सफर

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : पोलाद स्टील कंपनी व श्रेयस सिमेंट हाऊस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तारांगण या उपक्रमातून श्रीमान गोकुळचंद विद्यालयात विद्यार्थ्यांनी थ्रीडी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आकाशगंगेची सफर केली. मार्केटिंग बरोबरच सामाजिक क्षेत्रात कार्याची भावना जोपासत पोलाद स्टील कंपनी व श्रेयस सिमेंट हाऊस यांनी ही संधी उपलब्ध करून दिली.

यावेळी श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां बरोबरच मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळळकर, उपमुख्याध्यापक श्री.रमेश गायकवाड व पर्यवेक्षक श्रीमती उमा रायते आणि सर्व शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घेतला. आकाशगंगातील   खगोलीय वस्तू, त्याचबरोबर सूर्यमालेतील ग्रहांचा अभ्यास व त्याची माहिती घेताना विद्यार्थ्यांना आपण स्वतः अवकाशात असल्याची आभासी अनुभूती मिळाली.

 यावेळी विद्यार्थ्यांनी याबाबतचे अनुभव कथन केले तसेच या माध्यमातून अशाप्रकारे अभ्यास करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी पोलाद कंपनीचे मार्केटींग आफीसर अजय कुलकर्णी, प्लनेटोरीयम ऑपरेटर अभिषेक ढवळे, मदतनीस श्री.प्रशांत पंडीत आदींचा सत्कार  संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे आदींच्या शुभहस्ते करण्यात आला.                हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.