कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विकासाला गती देण्यासाठी विविध नगरपंचायतींना नगरविकास मंत्रालया अंतर्गत निधी दिला आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधांच्या कामासाठी कोपरगाव नगरपरिषदेला दीड कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. कोपरगाव शहरात रस्ताकॉंक्रिटीकरण व सुशोभीकरणासाठी हा दीड कोटी रुपयांच्या निधीचा वापर केला जाणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या पाठपुरावामुळे हा निधी मिळाला असल्याचे कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. या अगोदरही कोपरगावच्या विकासात भर घालण्यासाठी औताडे यांनी जॉगिंग ट्रॅकसाठी एक कोटी रुपयांचा निधी आणला होता. मंजूर झालेल्या या दीड कोटी रुपयांच्या निधीमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये आहेर वखार ते शिंदे घर रस्ता काँक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये, शंकरनगर येथे विसपुते घर ते ओम नगर पूल रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी 15 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुभद्रा नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख रुपये, प्रभाग क्रमांक 4 मध्ये अन्नपूर्णा नगर बागुल वस्ती येथे दत्त मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक व सुशोभीकरण करण्यासाठी 15 लाख रुपये.
प्रभाग क्रमांक 6 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पोहेगाव नागरी पतसंस्था रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख रुपये. प्रभाग क्रमांक 10 मध्ये संजय नरोडे घर ते एकविरा किराणा दुकान रस्ताकॉंक्रिटीकरण करणे 15 लाख रुपये. प्रभाग क्रमांक 11 मध्ये हनुमाननगर मधील खांडेकर घर ते हनुमान मंदिर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख व गांधीनगर मधील गांधीजींचा पुतळा ते मंजुळ घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 15 लाख रुपये.
प्रभाग क्रमांक 12 मध्ये मारुती मंदिराचे सुशोभीकरण करणे 15 लाख रुपये व प्रभाग क्रमांक 14 मध्ये बेट ते कचेश्वर मंदिर रोड खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख रुपये. असे एकूण दीड कोटी रुपयांचा निधी या कामी खर्च होणार आहे.कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांचे कोपरगाव शहर शिवसेना, युवा सेनेच्या वतीने विमलताई पुंडे, अक्षय जाधव, अभिषेक आव्हाड, मनील नरोडे, विनोद गलांडे, मनोज राठोड, पवन गायकवाड, ज्ञानेश्वर कपिले आदींनी आभार मानले आहे.