कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : जीवनाच्या प्रत्येक जबाबदारीत वेळेच्या व्यवस्थापनाला अतिशय महत्व आहे. प्रत्येक जबाबदारी पेलण्याच्या अगोदर जबाबदारीचा पुर्व अभ्यास करावा. प्रत्येक कामात सातत्य ठेवावे आणि आपले ध्येय उच्च ठेवावे. आयआयटी लेव्हलच्या स्पर्धा संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये घेण्यात आल्या, ही बाब कौतुकास्पद आहे. यात संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यशही मोठे आहे. असेच कठोर परीश्रम करीत रहा, जिध्द ठेवा असे प्रतिपादन शिर्डी येथिल अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्ली आयोजित व एबीएल ग्रुप कंपनी प्रायोजीत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत राष्ट्रीय पातळीवरील ‘ क्रिएटिव्हीटी लिग २०२४’ या स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धांच्या बक्षिस वितरण समारंभात कोळेकर प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. या स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी, कोपरगांव व संजीवनी इंटरनॅशनल स्कूल, शिर्डी येथिल विद्यार्थ्यांनी आपल्या कुशाग्र बुध्दिमत्तेच्या जोरावर तांत्रिक स्पर्धेत उत्तम कामगिरी केली, अशी माहिती दोनही स्कुल्सच्या वतीने देण्यात आलेल्या संयुक्तिक प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
या स्पर्धेसाठी देशातील विविध शाळांच्या एकुण १०० संघांनी भाग घेतला होता. सर्जनशिलता, नाविन्य आणि उद्योजगकता या बाबींचा समावेश असलेल्या तीन वर्गवारीमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजिका अर्चना उत्तमराव कोते यांचे हस्ते झाले संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनीही सर्व विजेत्यांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. समारोप प्रसंगी प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस रेखा साळूंके व संगणक शिक्षक आदित्य गायकवाड उपस्थित होते.
रोबोक्वेस्ट वर्गवारीतील स्पर्धेत पाचही रॅन्क संजीवनीच्याच संघानी मिळविले. यात अर्चित प्रशांत कडू, ईशान सचिन क्षिरसागर व स्पंदन प्रकाश जाधव यांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. साई गणेश सिनगर, आयुश अतुल बोरणारे व अर्णव प्रदिप औताडे यांनी दुसरा क्रमांक मिळविला. राजविका अमित कोल्हे, तनवी अतुल गोंदकर, नील विकास काटे, सर्वेश तुषार शेळके व जय तरूण भुसारी यांच्या संघाने तिसरा क्रमांक मिळविला. साईप्रतिक ब्नारायण बेहरा, आरव हर्षल दोषी व साईश प्रशांत दोडिया यांच्या संघाने चौथा क्रमांक मिळविला. प्रज्वल भागवत भड, श्रेयश सोमनाथ क्षिरसागर व देवांशु अरविंद चौधरी हे पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
स्टेमप्रिनर वर्गवारीमध्ये चैन्नईच्या चिन्मय इंटरनॅशनल स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. पुढील दोन ते चार क्रमांक संजीवनीच्या संघांनी जिंकले. यात जिया नरेश पारख, नील द्वारकानाथ अरिंगले व प्रथमेश प्रविण बोराडे यांनी दुसरा क्रमांक मिळविला. रघुनाथ विनोद लोंगाणी याने एकट्यानेच सहभाग नोंदवुन तिसरा क्रमांक पटकाविला. तर स्वरूप सुदाम काळे व ओम संतोश मुदबखे हे चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
अॅस्ट्रोप्रिनर वर्गवारीत संजीवनच्याच देवांग तुषार जमदडे, कृष्णा संतोश नवले व स्वरा अजित कोकाटे यांच्या संघाने चौथा क्रमांक मिळविला तर शोभित सुमेध इंगळे, मिहिका काळे व उज्वल सानप यांनी पाचवा क्रमांक मिळविला. प्रथम विजेत्या संघांना नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर, इस्त्रो आणि सिलीकॉन व्हॅली येथे मोफत सहलीचा आनंद मिळणार आहे.