कोपरगाव प्रतिनिधी, दि. २१ : रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे. रुग्ण सेवेतून प्रत्येकांचा अंतरात्मा बरा करतो परंतू रूग्णांची काळजी घेण्याचे काम आत्मा मालिक हाॅस्पिटलमध्ये ईश्वर सेवा म्हणून रुग्णांची अधिक काळजी घेवून अनेक रोगावरील उपचार मोफत करुन खऱ्या माणुसकीचे दर्शन घडवत आत्मा मालीक माऊलींच्या विचाराला अनुसरुन तसेच आश्रमाचे ब्रिद वाक्या प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे काम आपण करीत आहोत असे मत विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालीक हाॅस्पिटलमध्ये आज पासुन २१ जून २०२५ पर्यंत सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे त्याचे उद्घाटन आत्मा मालिक ध्यान पिठाचे संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी सह सर्व पदाधिकारी, संत व संत माता यांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिरा संदर्भात पञकाराशीं संवाद साधताना अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी पुढे म्हणाले की, आत्मा मालीक हाॅस्पिटल हे सर्व सुविधा नियुक्ती सुसज्ज शंभर बेडचे हॉस्पिटल असुन येथे अनेक नामवंत तज्ञ डाॅक्टर कार्यरत आहेत. देशातील गरजू व व्याधिने ञस्त झालेल्या रुग्णांची योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी आत्मा मालीक हाॅस्पिटलमध्ये अनेक उपचार मोफत करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासणी मोफत, डोळे तपासणे, दंत तपासणी, बीपी, शुगरच्या तपासण्यासह टूडी इको, अॅन्जीओग्राफी मोफत तपासण्या करण्याची व्यवस्था केली आहे. सर्व औषध, उपचारांवर भरघोस सवलती देण्यात आल्या आहेत. आरोग्य योजनेतील उपचार सुरुवातीपासून शंभर टक्के मोफत करण्याची व्यवस्था आत्मा मालीक हाॅस्पिटलमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास ८३७ रूग्णांनी लाभ घेतला आहे.
या शिबीरात अंदाजे ३५ हजार पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्याचे उद्दिष्ट व्यवस्थापनाने केले आहे. एकाच वेळेस इतक्या सर्व आरोग्य सेवा मोफत व नाममाञ दरात देणारे हे पहीले हाॅस्पिटल आहे. त्यामुळे येथे उपचार करुन घेण्यासाठी नागरीकांणी रिघ लागली आहे अशी माहिती आत्मा मालिक हाॅस्पिटलच्यावतीने अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले. येथे केवळ औषध उपचारच नाही तर रुग्णांना व सोबतच्या व्यक्तीला नाष्टा व जेवणही मोफत देवून आश्रमाने माणुसकीचे नवे दर्शन घडवले आहे.
येथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी चार ऑपरेशन थेटर सज्ज करण्यात आले आहेत. सर्वरोगावरच्या विविध तपासण्या करण्यासाठी आधुनिक तपासणी प्रयोगशाळा असल्याने बहुतांश रोगावरचे उपचार एकाच ठिकाणी होणार असल्याने रुग्णांसह नातेवाईकांना आत्मा मालीक हाॅस्पिटलने दिलासा दिला आहे तेव्हा या शिबिराचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पञकाराशीं संवाद साधते वेळी अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, आत्मा मालीक हाॅस्पिटलचे व्यवस्थापक सुनिल पोकळे, सीईओ डॉ. नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.