शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील उत्तम भीमराव केसभट यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याच्या निषेधार्थ गेवराई तालुक्यातील राक्षस भवन येथील गोदावरी पात्रात गेल्या २ फेब्रुवारी ला आत्महत्या केली होती. शासनाने त्याची दखल घेऊन आत्महत्या केलेल्या केसभट यांच्या पत्नी सिंधू बाई उत्तम केसभट यांना गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे व आमदार विजयसिंह पंडित, जय भवानी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब नाटकर यांच्या उपस्थितीत नुकताच दहा लाख रुपये निधीचा धनादेश दिला आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणारे केसभट गरीब कुटुंबातील असल्याने त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. यावेळी गायकवाड जळगावचेअंकुश केसभट, परशुराम गरड, शेकटे बु॥ चे उमेश केसभट, विकास केसभट शिवदर्शन केसभट आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
