चापडगाव नदीवरील बंधारे भरावेत – संतोष गायकवाड

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : ताजनापूर उपसा जलसिंचन योजनेमधून तालुक्यातील चापडगाव नदीवरील बंधारे तातडीने भरून द्यावेत अशी मागणी खासदार निलेश लंके यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. खासदार लंके चापडगाव मार्गे जात असतांना त्यांना थांबवून   त्यांचेशी संवाद साधत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड व परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस ॲड .प्रताप ढाकणे होते.

निवेदनात गेल्या अनेक वर्षापासून चापडगाव व परिसरातील शेतकरी संथ गतीने सुरु असलेल्या ताजनापुर सिंचन योजनेसाठी संघर्ष करत  असून मागील वर्षी दोन वेळेस येथील नदीवरील बंधाऱ्यांमध्ये ताजनापुर लिफ्टचे पाणी सोडल्याने परिसराला  मोठा फायदा झाला. यावर्षी देखील हे बंधारे भरण्याची आवश्यकता असल्याने  ते भरून देण्याची मागणी  करण्यात आली असून  त्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी  सरपंच शहादेव  पातकळ, राजु  पातकळ, ग्रां प सदस्य निलेश गायकवाड, सुभाष लोहकरे, अशोक गायकवाड, शहाजी  जाधव, भागावत पातकळ, बाळासाहेब पातकळ, मनोजकुमार नेमाने, कृष्णा जगताप उपस्थित होते.