राहाता प्रतिनिधी, दि. ४ : पहिल्या भारतीय महिला शिक्षिका, समाज उद्धारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची ९४वी जयंती साईफाउंडेशनने साजरी केली. यावेळी महिला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून यशवी राजेंद्र दायमा हिने सी.ए.परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल साईयोग फाउंडेशनच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा कन्यादिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त छोटी कुमारी राजेश्वरी संतोष बावके हीचा देखील सन्मान करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्रवीण खंडिझोड म्हणाले सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी समाज मनाच्या अज्ञानाच्या चाली रीतीच्या गाड्याला शिक्षणरूपी धक्का देत रुतलेले अंधश्रद्धा रुपी चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना मोलाची साथ क्रांतिसुर्य जोतिबा फुलेंची लाभली.त्याचं बरोबर त्या खऱ्या समाज उद्धारक होत्या त्यांनी फक्त शिक्षणच दिले नाही तर, केशवपण, विधवा विवाह, आरोग्य या सर्व क्षेत्रात कार्य केले.

आपल्या अंगावर झेललेल्या शेणामातीच्या गोळ्यामुळेच पुढील पिढीला स्वतःचा उत्कर्ष करता आला.म्हणून सर्व महिलांनी सावित्रीबाईंचा सन्मान करण्या बरोबरच त्यांच्या विचारांचा जागर सुद्धा केला पाहिजे. याप्रसंगी अरुण मोकळ,राजेश दायमा, ॲड दत्तात्रय धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळासाहेब गाडेकर यांनी केले. तर आभार सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी मानले.

याप्रसंगी बाळासाहेब सोनवणे, साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे, माजी सैनिक भानुदास गाडेकर, माजी नगरसेविका अनुराधा तुपे, सुष्मिता चव्हाण, कांचन बावके, उज्वला गाडेकर, नीलम चेनुके, आशा पिपाडा, पुष्पांजली दायमा, सुनिता बोबडे, ॲड.गोरख दंडवते, विलास वाळेकर, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, मनोज पिपाडा, बबलू फटांगरे, संजय वाघमारे, संजय बाबर, अनिल सातव, दीपक दंडवते, व्यंकटेश अहिरे, उमेश लुटे, दीपक गाडेकर, विठ्ठल निर्मळ, संतोष बावके, पांडुरंग गायकावड, बाळासाहेब तारगे, रंगनाथ सदाफळ, विष्णू गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
