धम्म संस्कार केंद्र निधीसाठी आठवलेना साकडे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १५ : शेवगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांना धम्माचे मार्गदर्शन मिळावे म्हणून विदर्भातून वास्तव्यास आलेल्या श्याक्यपुत्र राहुल भन्ते  यांच्या संकल्पनेतून पैठणतालुक्याच्या सिमेवरील तेलवाडी येथे जेतवन धम्म संस्कार केंद्र उभारणीचे काम गेली अनेक दिवसापासून सूरू असून ७० टक्के काम झाले आहे. प्रगती पथावर असलेल्या केंद्राच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी  संस्कार केंद्र समितीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचेकडे निवेदना द्वारे करण्यात आली.

यासाठी ॲड. पी. एन. काकडे, डॉ पंडित किल्लारीकर, शिवविलास सोनकांबळे यांचेसह अनेक नागरिक योगदान देत आहेत. या कामाचा लोकार्पण सोहळा राज्याचे तत्कालीन कॅॅबिनेट मंत्री व विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचे  हस्ते २७ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडला आहे. या केंद्राच्या  निर्मितीसाठी शासन पातळीवरून निधी उपलब्ध व्हावा म्हणून जेतवन संस्कार केंद्र समितीने आठवले यांची समक्ष भेट घेऊन मागणी केल्याची माहिती  केंद्राचे सचिव अरुण बल्लाळ यांनी दिली आहे.

ते म्हणाले, आज पर्यंत  केंद्राचे झालेले काम लोकवर्गणीतून करण्यात आले असून येथे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला  धम्माचा कार्यक्रम होत आहे. यावेळी  ज्येष्ठ मार्गदर्शक सुंदरराव निसर्गन, आशोक पगारे, सतिष बोरुडे, भारत मुकुटमल व अरुण बल्लाळ उपास्थेत होते. 

Leave a Reply