कोपरगांव प्रतिनिधी, दि.२० : उसतोडणी मजुरांचे कामानिमीत्त सातत्यांने स्थलांतर होत असते त्यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांड होवु नये म्हणून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उसतोडणी कामगारांची हंगाम काळात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दर पंधरा दिवसाला आरोग्य तपासणी करून विनामुल्य औषधोपचार केले जातात.

तालुक्यातील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावरील उस तोडणी मजुरांचे आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले. केन मॅनेजर जी. बी. शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी हंगाम काळात स्थलांतरीत उसतोडणी मजुरांच्या प्रत्येक समस्या जाणून घेत त्याची सोडवणुक केली त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे कामाच्या व्यासंगातुनही उसतोडणी मजुर, महिला, अबालवृध्दांच्या आरोग्याची काळजी घेतात, वेळप्रसंगी रूग्णवाहिकेसह तात्काळ आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देतात.

यावेळी संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स यांनी आरोग्य तपासणीचे महत्व विषद करून राज्य शासनाच्या विविध मोफत योजना, सोनोग्राफी, एक्स रे, तसेच रक्तांच्या वेगवेगळ्या आजारांच्या चाचण्या याबाबत विस्तृत योग्य माहिती देवुन या शिबीरात व नंतरही पी एच सी मार्फत तज्ञ डॉक्टर्सकडुन तपासणी करून घेणेचे आवाहनही करणेत आले.

याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक मनेष गाडे, रमेश घोडेराव, विलासराव माळी, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, माजी सभापती सुनिल देवकर, संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. राजेंद्र भानुदास पारखे, डॉ. कृष्णा पवार, डॉ. संयुक्ता खळदकर, त्यांचे सर्व सहकारी, अंगणवाडीताई, मदतनीस, शिंगणापुर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे सर्व सहकारी, सिक्युरिटी ऑफिसर रमेश डांगे, उसतोडणी मुकादम, कामगार, महिला, अबालवृद्ध्द मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक रमेश घोडेराव यांनी आभार मानले. संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिका-यांनी लहान मुलांचे लसीकरण, महिलांचे आजार, हिमोग्लोबीन, जंत निर्मुलन आदि आरोग्यविषयक आजार त्यावरील उपाययोजनाबाबत जनजागृती केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी कारखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज बत्रा, बाळासाहेब पानगव्हाणे यांनी विशेष प्रयत्न केले.

