अभिनेत्री रवीना टंडन हिने बुधवारी साई दरबारी

  शिर्डी प्रतिनिधी, दि. २३ :   नव्वदीच्या दशकात हिंदी चित्रपटात आपल्या अदा आणि अभिनयाने सुपरहिट ठरलेली अभिनेत्री रविना टंडन हिने बुधवारी साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतले. रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी हिने आझाद चित्रपटातून नुकतेच पदार्पण केले असुन तिचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.

आझाद चित्रपटात अजय देवगणसह त्याचा पुतण्या अमन देवगणची देखील भुमिका आहे तर राशा थडानीच्या नृत्य आणि अभिनयाच देखील चित्रपट प्रेमींकडून कौतूक होतय. १७ जानेवारी आझाद हा चित्रपट प्रदर्शित झाला असुन चित्रपटाने चांगली कमाई केलीय. प्रसारमध्यमांशी बोलताना अभिनेत्री रविना टंडन म्हणाल्या बालपणापासुन शिर्डीला येत असते. साई मंदिरात मला माझे वडील साईबांबासमोर हात जोडून उभे असल्याचा भास होतो…दोघांचेही आशिर्वाद मला येथे आल्यानंतर मिळतात.

आझाद चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय याचा आनंद आहे मात्र सध्याचा काळ नवोदीत कलाकारांसाठी संघर्षाचा आहे. राशाला साईबाबांनी सांभाळून घेतल्यान तिच फार कौतुक होतय. साईबाबा आम्हाला सांभाळून घेतात त्यामुळे आभार माणण्यासाठी आल्याचे रविनाने सांगितले. सैफ अली खानच्या प्रश्नावर रविनाने बोलण्याच टाळत हे पवित्र स्थान असून साईबाबांबद्दल विचारा मी उत्तर देईल अस म्हणत अधिक बोलण्याच टाळल.

Leave a Reply