डॉ. पुष्कर दाणे एफएमजीई परिक्षा उत्तीर्ण 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : तालुक्यातील पढेगावचे रहिवासी असलेले जनता इंग्लिश स्कूल सवंत्सर येथील माध्यमिक शिक्षक रमेश दाणे यांचे चिरंजीव आणि पत्रकार गणेश दाणे व प्राध्यापक डॉ.योगेश दाणे यांचे पुतणे डॉ.पुष्कर दाणे यांनी रशियात इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल यूनिवर्सिटी कालिनींग्रद येथे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून  नुकतीच भारत सरकारची फॉरेन मेडिकल ग्रेजुएशन परीक्षा (एफएमजीई) पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे.

या परीक्षेत ४५५५२ विधार्थ्यांचा सहभाग होता त्यातून १३१४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल अवघा २८.८६% इतका लागला असून त्यांच्या यशाबद्दल आमदार आशुतोष काळे, पढेगाव ग्रामस्थांसह विविध मान्यवरांकडून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.