बालमटाकळीच्या शाळेला एलआयसीचा बिमा स्कूल पुरस्कार

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील बालमटाकळीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एलआयसीचा ‘बिमा स्कूल पुरस्कार’ मिळवणारी पुणे विभागातील पहिली शाळा ठरली आहे. एलआयसीने नुकतेच रोख पारितोषकासह सन्मानचिन्ह देऊन शाळेला गौरविले आहे.

यावेळी सरपंच डॉ. राम बामदळे, ज्येष्ठ नेते रामनाथ राजपुरे, शिक्षण विस्ताराधिकारी डॉ. शंकर गाडेकर यांनी शाळेचे कौतुक केले.  केंद्रप्रमुख काळू,  डॉ. प्रकाश घनवट, हरिश्चंद्र घाडगे, मधुकर पाटेकर, बाबासाहेब सोनवणे, विठ्ठल देशमुख, भारत घोरपडे, रावसाहेब भाकरे, ताराचंद शेळके, संजय फुंदे, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

शाळेतील विद्यार्थ्यांना बालपणापासूनच बचतीची सवय लागावी तसेच भविष्यात शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद व्हावी. या उद्देशाने एक सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाबाबत शाळेतील मुले व शिक्षकांना त्याच गावातील सुपुत्र व विमा प्रतिनिधी जालिंदर जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तेव्हा शाळेतील २७ विद्यार्थ्यांनी विमा योजनेत यथाशक्ती गुंतवणूक केली आणि विशेष म्हणजे यावेळी एलआयसीच्या पुणे विभागात बालमटाकळी जिल्हा परिषद शाळा, ‘विमा गुंतवणुकीत प्रथम ठरली. त्यामुळे पुणे विभागाकडून पहिल्यांदाच’  बिमा स्कूल पुरस्कार’ जिल्हा पारिषदेच्या शाळेस प्राप्त झाला आहे.

शेवगाव येथील एल आयसी चे वरिष्ठ शाखाधिकारी प्रमोद देव, प्रशासकीय अधिकारी संजय भळगट यांच्या हस्ते शाळेला   दहा हजाराच्या रोख पारितोषिकासह  ‘बिमा स्कूल पुरस्कार’ देऊन गौरविले. विमा प्रतिनिधी जाधव यांनी सर्व युवा विमा धारकांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले. 

मुख्याध्यापिका विजया कवडे यांनी प्रास्ताविक केले. देविदास गरकळ, किरण बैरागी यांनी सूत्रसंचालन केले. कल्याण पोटभरे यांनी आभार मानले. सोहळ्या साठी जयराम देवळे, रुस्तुम, दत्तात्रय मजनर, दिगंबर गाडेकर, अनिता हिवाळे, मनीषा मिसाळ, प्रीतम बैरागी आजींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply