बंदूकीचा धाक दाखवत साई भक्तांना १ लाखाला लुटले

सोन्याचांदीच्या दागिने, मोबाईलसह एक लाखांचा ऐवज लंपास

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : तालुक्यातील वेळापूर शिवारात गुजरात येथील साईभक्ताच्या गाडीला अडवत बंदूक, कोयते, गुप्ती सारख्या धारधार शस्राचा धाक दाखवत सात ते आठ अज्ञात आरोपींनी सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल असा तब्बल एक लाख आठशे रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोहित महेश पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सुरत येथील मोहित पाटील आपल्या चार मित्रांसमवेत इरीटीका क्र जी.जे.०५ आर. वाय. १८३३ या वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते. दि.१६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सहा वाजता ते तालुक्यातील वेळापूर शिवारात आले असता पाठीमागून ओव्हरटेक करत एक कार आडवी आली.

त्यातून एक जण खाली उतरून गाडी अशी चालवता का? असे म्हणाले. त्यानंतर माझा मित्र आकाश पाटील यांनी विचारणा केली असता समोरच्या गाडीतून सात ते आठ इसम त्यात एकाच्या हातात गन व काही जणांकडे कोयता, गुप्ती सारखे हत्यारे होती. आधी हिंदीतून शिवीगाळ केली.

नंतर शस्राचा धाक दाखवत आमच्याकडील ८१ हजार रुपयांचे सोन्याच्या वस्तू, पंचधातूची अंगठी, चांदीचे ब्रासलेट, मोबाईल व रोख रक्कम असे एक लाख ८०० मुद्देमाल चोरून नेला. आरोपी शिवीगाळ करून आमच्या गाडीच्या काचा फोडून निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पुढील तपास करीत आहे.      

Leave a Reply