कोपरगाव तहसील कार्यालयात २८ फेब्रुवारी रोजी आमदार काळेंचा जनता दरबार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी शुक्रवार (दि.२८) रोजी दुपारी २.०० वाजता तहसील कार्यालय, कोपरगाव येथे आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात आली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रशासकीय कार्यालयातील असणाऱ्या समस्या सुटण्यास मोठी मदत होत असून मतदार संघातील नागरीक जनता दरबारात आपापल्या समस्या मांडून त्या सोडवून घेत आहेत त्यामुळे जनता दरबाराला नागरीकांची मोठी गर्दी होत आहे.

जनता दरबारात नागरिकांच्या अडचणी सबंधित अधिकार्‍यांपुढे मांडल्या जावुन त्याच ठिकाणी नागरीकांची समस्या सुटत असल्यामुळे नागरिकांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असणार्‍या सर्वच तक्रारींचे निवारण एकाच ठिकाणी होत आहे. ज्या नागरीकांचे महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागा संदर्भात समस्या व अडचणी आहेत. अशा नागरीकांनी त्याबाबत ‘जनता दरबारात’ लेखी स्वरूपात अर्ज घेवून उपस्थित राहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.