कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : नोबेल पारितोषिक विजेते डॉ.सी.व्ही. रामन यांच्या वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ आपल्या देशात दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. विज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी व त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये देखील राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याप्रमाणे याहीवर्षी संस्थेच्या सचिव चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत असलेले संस्थेचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव चैतालीताई काळे यांच्या हस्ते नोबेल पारितोषिक विजेते डॉ.सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व संस्था सदस्य, प्राचार्य नूर शेख, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

या प्रसंगी विज्ञान विषय शिक्षिका सौ. प्रतिभा बोरनार यांनी डॉ.सी. व्ही. रामन यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. कुतूहल, आवड, जिज्ञासेने भारावलेले गौतमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नवनवीन व उत्तमोत्तम सायन्स मॉडेल्सची अध्यक्ष मा. आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विभाग पर्यवेक्षिका ज्योती शेलार व प्राथमिक विभाग पर्यवेक्षक राजेंद्र आढाव यांनी सहकार्य केले. या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून गौतम पब्लिक स्कूल कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच वैज्ञानिक क्षेत्रात देखील मागे नसल्याचे दिसून आले.

याप्रसंगी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित मान्यवरांच्या समवेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गौतमच्या विद्यार्थी वैज्ञानिकांनी तयार केलेल्या विविध उपकरणांची पाहणी करून सर्व बाल वैज्ञानिकांचे अभिनंदन व कौतुक केले. विज्ञान शिक्षक एस. बी. शिंदे, प्रतिभा बोरनर, प्रतिभा देशमुख, वैशाली उंडे, भारती उंडे, डी. एन. शिंदे व शेळके यांनी मेहनत घेतली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी सुशीलामाई काळे (माई) यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या फुलांनी बहरलेल्या ‘माईज गार्डन’चे कौतुक करून समाधान व्यक्त केले.
