रस्त्याच्या कडेला उस विक्री करणाऱ्यांमुळे महीलेचा अपघाती मृत्यू 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२० : कोपरगाव शहरातील येवला रोड येथे ऊसाच्या ट्रॅक्टरचा दुचाकीला धक्का लागुन दुचाकीवरील पती-पत्नी कंटेनरच्या चाकात अडकले त्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.

 बऱ्याच दिवसांपासून ऊस आडते रस्त्यावर ऊसाची विक्री करुन नागरीकांच्या जीवीतास धोका निर्माण करीत आहेत. स्थानिक नागरीकांच्या तक्रारीला दादागिरीने उत्तर देवून मनमानी करणाऱ्या उस विक्रेत्यांनी अखेर अपघात घडवून एका महीलेचा बळी घेतलाच. आजून किती बळी गेल्या नंतर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लावून ऊस विक्री करण्याची विकृती थांबेल. 

 या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की, शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास राहता तालुक्यातील साकुरी येथे नातेवाईकाच्या दशक्रीयेसाठी गेलेले रामकृष्ण माधव महाले व संगिता रामकृष्ण महाले हे दांपत्य दशक्रिया विधी आटोपून येवल्याकडे जात होते.

कोपरगाव शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील उमा वे ब्रिज अर्थात वजन काट्याजवळ ऊसाचे आडते अर्थात चाऱ्यासाठी लागणारा उस विक्री करीता महामार्गावर ऊसाच्या गाड्या लावून विक्री करत असतात. उसाचा एक ट्रॅक्टर चिखलातून मागेपुढे करत असताना येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या महाले यांच्या दुचाकीला अचानक धक्का लागला.

दुचाकी चालवणारे रामकृष्ण माधव महाले यांचा अचानक तोल गेला आणि काही समजण्याच्या आतच ते दुचाकीसह खाली रस्त्यावर पडले पाठीमागुन फटाक्याने भरलेला कंटेनर टी. एन. – ८८ जे ४१८३ हा पाठीमागुन जोरात येवल्याच्या दिशेने चालला होता. दुचाकी एम एच १५ ई व्ही. ३१६४ वरील रामकृष्ण महाले व संगिता महाले यांची कंटेनरला धडक बसली त्यात संगिता रामकृष्ण महाले वय ५७ वर्षे या महिलेच्या डोक्यावरुन कंटेनरचा मागचा चाक गेल्याने त्यांचा संपूर्ण चेहऱ्यासह डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या तर रामकृष्ण माधव महाले वय ६४ वर्षे हे बाजुला फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्यानंतर  कंटेनरचा चालक गाडी सोडून पळून जात होता, परंतु पोलीस व स्थनिक नागरीकांच्या मदतीने तातडीने रुग्णवाहिका बोलवून  जखमीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला उपचारासाठी दाखल केले. तेथे संबंधित डाॅक्टरांनी तातडीने योग्य उपचार केल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर चालकाला पोलीसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीस निरीक्षक रामचंद्र कुंभार यांनी आपला फौजफाटा घटनास्थळी पाठवून तातडीने सर्व यंञणा सतर्क केली. या भिषण अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर नगर मनमाड महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. पोलीसांनी रस्त्याच्या कडेला उस विक्री करण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरसह इतर सर्व वाहने बाजुला केली काही वाहने ताब्यात घेतली. वाहतुकीची झालेली कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली.

 दरम्यान या अपघातील जखमी रामकृष्ण माधव महाले रा. वेद काॅलनी येवला जि. नाशिक मुळ राहणार अंदरसुल यांच्या तक्रारीवरून  कंटेनरचा चालक अय्याहु अतिय्याप्पा गोंउडर रा. इस्ट स्ट्रिट पल्लयालम जि. नमक्कल तामिळनाडू याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply