नाशिक धरण परिसरात संततधार पावसामुळे गोदावरी दुथडी वाहू लागली

मराठवाड्यातील जायकवाडी ५३ टक्के भरले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : अहिल्या‌नगर, नाशिकसह मराठवाड्यातील नागरीकांना कायम चिंता असलेले जायकवाडी धरण आज रोजी तब्बल ५३ टक्के भरल्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्या तीनशे खेड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. आता नाशिक परिसरातील धरणाच्या साठलेल्या पाण्यातून यावर्षी  जायकवाडीत पाणी सोडण्याची गरज नसल्याने नगर नाशिककरांची चिंता मिटली आहे.

गेल्या वर्षी जायकवाडी धरणात आजच्या तारखेला केवळ ५.५४ टक्के पाणी साठा होता. माञ यावर्षी नाशिक धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने  जुलैच्या पहील्याच आठवड्यात सध्या तब्बल ५३ टक्के पाणी साठा झाला आहे.एकट्या गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणात  २१ टी एम सी पाणी विसावले आहे.सध्या गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असुन नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदी पात्रात ४३हजार ८५२ क्युसेक्स वेगाने पाणी जायवाडीच्या दिशेने झेपावत आहे.

नाशिक परिसरातील धरणांमध्ये सध्या ७१.४१ टक्के उपलब्ध पाणी साठा असुन तोच गेल्यावर्षी केवळ ११.६२ टक्के होता. सध्या नाशिक येथील भाम , भावली, वालदेवी, आळंदी, भोजापुर, हरणबारी, केळसर  हि धरणं शंभर टक्के भरली आहेत. तर दारणा- ६८.८५, मुकणे – ७४.३६, वाकी – ८६.८८, पालखेड – ५३.७५, गंगापूर – ६१.६२, कश्यपी – ८५.९६,

गौतमी – ७६. ७, कडवा – ६५.४६ ओझरखेड – ४६. ९०, वाघाडी – ७८.३७ आणि पुणेगाव धरण ७५.३२ टक्के इतके भरले आहे आजूनही या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने गोदावरी नदी काठोकाठ भरुन वाहत आहे.पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

 सध्या एकट्या दारणा धरणातून १३ हजार १६० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे आत्तापर्यंत दारणा धरणातून ६ टीएमसी पाणी वाहुन गेले आहे.  पावसाचा जोर सर्व असल्याने यावर्षी जायकवाडीत धरणात कमी काळात विक्रमी पाणी जाण्याची शक्यता आहे. नगर नाशिकसह मराठवाड्यातील नागरीकांना हा पावसाळा दिलासा देणारा असल्याचे चिञ दिसत आहे. 

Leave a Reply