शिवकालीन १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्यांच्यावर उभं राहून इतिहास घडवला, अशा १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची ऐतिहासिक घोषणा म्हणजे महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण आहे.

या घोषणेमुळे या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण, संवर्धन आणि अभ्यासासाठी नवी दारे उघडली आहेत. भविष्यातील पिढ्यांना शिवकालीन वैभव प्रत्यक्ष अनुभवता यावे, यासाठी हा निर्णय अत्यंत मोलाचा आहे.

या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कोपरगाव मतदारसंघात जल्लोष साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि लाडू वाटप करत नागरिकांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहर मंडल अध्यक्ष वैभव आढाव, पूर्वमंडळ अध्यक्ष विशाल गोर्डे, पश्चिम मंडल अध्यक्ष सुनील कदम, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गवळी, बाळासाहेब नरोडे, माजी अध्यक्ष कैलासराव रहाणे, राजेंद्र सोनवणे, गोपीनाथ गायकवाड, प्रदीप नवले, भीमा संवत्सरकर, संदीप गुरुळे, प्रकाश दवंगे, सतीश रानवडे, आकाश वाजे, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, विजय चव्हाणके,

सोमनाथ मस्के, रवी शेलार, शिवप्रेमी अजय सुपेकर, राकेश काले, अमोल पेकळे, देव बागुल, कैलास राहणे, दीपक चौधरी, शशिकांत दरपेल, मुकुंद उदावंत, मनोज इंगळे, संदीप गायकवाड, कैलास नागरे, निखिल वर्मा, साई नरोडे, सुजल चंदनशिव, रोहित आढाव, शुभम सोनवणे, अर्जुन मोरे, रोहिदास पाखरे, संजय खरोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.