बार असोसिएशनच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध -आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. 31 : वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण मला सेवा करण्याची संधी दिली तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले असून त्या प्रयत्नातून न्यायालयाच्या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. वकील संघाच्या यापूर्वीच्या अडचणी मागील पाच वर्षात पूर्ण झाल्या असून राहिलेल्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आपण मला पुन्हा निवडून दिले याची मला जाणीव आहे. आपल्या अडचणी सोडविणे हे माझे कर्तव्य असून बार असोसिएशनच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव वकील संघाला दिली आहे.

कोपरगाव बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वकिल न्यायव्यवस्थेचा कणा असून हा कणा मजबूत ठेवण्यासाठी व वकील संघाच्या अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोपरगाव बार असोसिएशनची उत्कृष्ट परंपरा आहे. ही केवळ वकिलांची संघटना नसून ती कोपरगाव शहराच्या न्यायिक व सामाजिक प्रगतीचा महत्त्वाचा स्तंभ आहे.

नागरिकांमध्ये न्यायाविषयी विश्वास निर्माण करणे, ही काळाची गरज आहे आणि यासाठी वकील बांधवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजासाठी, सामान्य माणसासाठी आणि न्यायासाठी आपण सतत झटत रहावे. कोपरगाव बार असोसिएशन ही न्याय व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून नवीन पदाधिकारी बार असोसिएशनच्या सामाजिक जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडतील असा विश्वास यावेळी आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. शरद गुजर, उपाध्यक्ष अॅड. महेश भिडे, महिला उपाध्यक्ष अॅड. सविता कदम (पोळ), सेक्रेटरी अॅड. परेश डागा, सह सेक्रेटरी अॅड. महेश जाधव, खजिनदार अॅड. नितीन गिरमे, माजी अध्यक्ष अॅड. अशोकराव वहाडणे, अॅड. भास्करराव गंगावणे, अॅड. विद्यासागर शिंदे, अॅड. एम.एस. खिलारी, अॅड. पी.एस. चांदगुडे, अॅड. एस.जी. जामदार, अॅड. सौ. चारुशीला धोंडे, अॅड. सौ. देशमुख, अॅड. एस.डी. रक्ताटे, अॅड. डी.डी. उगले, अॅड. आतिश आगवन, अॅड. मनोज कडू, अॅड. एस.बी. लोहकणे, अॅड. एम.पी. येवले, अॅड. एस.पी. खामकर, अॅड. डी.डी. पोळ, अॅड. आर.एन. पिंगळे, अॅड. सुयोग जगताप, अॅड. जी.एम. गुरसळ, अॅड. व्ही.जी. काजळे, अॅड. प्रताप निंबाळकर, अॅड. एस.एम. मोकळ आदींसह वकील बांधव उपस्थित होते.

Leave a Reply