कोपरगाव प्रतिनिधी, दि. 31 : उजनी उपसा सिचंन योजननेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्ममधील ऑईल व तांब्याच्या कॉईल अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्या असून संबंधित व्यक्तीवर पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे यांच्याकडून शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उजनी उपसा सिचंन योजनेसाठी गोदावरी उजव्या कालव्यातून १५० एचपी पंपाद्वारे पाणी लिप्ट करुन धोंडेवाडी पाझर तलाव येथे सोडण्यात येते. त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथे सदर पंपासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे ३१५ केव्हिए क्षमतेचा ट्रान्सफार्म बसविण्यात आलेला आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी या योजनेच्या दुरुस्तीची कामे केली जातात. याहीवर्षी दि.१३ एप्रिल रोजी कालव्यामधुन इलेक्ट्रीक पंपाच्या सहाय्याने पाणी उचलुन चाचणी देखील घेण्यात आली होती.

आ.आशुतोष काळे यांनी याहीवर्षी उजनी उपसा सिंचन योजना सुरु करण्याच्या सूचना दिल्या असून गोदावरी कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळेमंगळवार (दि.२९) रोजी सदर योजनेचा पंप ऑपरेटर मच्छिंद्र शिरोळे व उजनी उपसा सिंचन योजनेचे अध्यक्ष बाबुराव थोरात वीज पंप चालु करणेसाठी गेलो असता सदर वीजपंप सुरु झाला नाही. त्यामुळे रोहित्रात काही बिघाड झाला आहे का? हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना ट्रान्सफार्ममधील ऑईल व तांब्याच्या कॉईल चोरी झाल्याचे दिसून आले.

त्याबाबत कनिष्ठ अभियंता अनिल प्रभाकर थोटे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून सदरच्या चोरीची घटना आ.आशुतोष काळे यांना समजताच त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनशी संपर्क करून लवकरात लवकर चोरीच्या घटनेचा तपास लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

ओव्हर फ्लोच्या पाण्यावर अवलंबून असणारी व रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी रांजणगाव देशमुख उपसा सिंचन योजना जीवनदायीनी आहे. हि योजना दरवर्षी सुरु रहावी यासाठी आ.आशुतोष काळे २०१९ पासून स्वत:च्या खिशातून दरवर्षी वीज बिलासह देखभाल दुरुस्तीचा खर्च करीत आहे. यावर्षी चोरट्यांनी या योजनेच्या टप्पा क्रमांक एकच्या शहापुर येथील ३१५ के.व्ही.ए. क्षमतेच्या ट्रान्सफार्ममधील ऑईल व तांब्याच्या कॉईल चोरून नेल्यामुळे ही योजना सुरु होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांची गरज ओळखून पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा तपास लावावा. – बाबुराव थोरात (अध्यक्ष-उजनी उपसा सिंचन योजना)
