पैशाच्या वादातून सासऱ्याचा जावयावर जीवघेणा हल्ला

  ५० लाखांच्या वादात स्वरुप कापे गंभीर जखमी

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.११ : रेल्वेच्या कामासाठी आणलेले मटेरियल शेतात टाकले होते. ते उचलण्याच्या बदल्यात ५० लाखांची मागणी जावायाकडे करीत सासऱ्याने थेट आपल्या चुलत जावायावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील वारी शिवारात घडली.

या घटने बद्दल पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील वारी येथील स्वरुप बाबासाहेब कापे हे रेल्वे रुळाच्या बाजुचे संरक्षण कंपाऊंड बांधण्याचा ठेका घेतला असुन त्यासाठी लागणारे साहित्य त्यांचे चुलत सासरे चंद्रकांत बाबुराव टेके व त्यांचा मुलगा आदित्य  चंद्रकांत टेके रा. वारी हल्ली राहणार कर्मवीरनगर कोपरगाव यांच्या शेतात टाकले आहे.

त्या शेतात टाकलेल्या साहित्याच्या बदल्यात ५० लाख रुपयांची मागणी केली त्यातून टेके व कापे यांच्यात बाचाबाची झाली त्यातुन रागाच्या भारात १० ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एक वाजता चंद्रकांत टेके व आदित्य टेके यांनी स्वरुप बाबासाहेब कापे रा. निवारा कोपरगाव यांच्या हातावर व खांद्यावर कोयत्याने वार करुन गंभिर जखमी केले.

अशी तक्रार स्वरुपचे मिञ विशाल लालजी पटेल रा. येवला रोड कोपरगाव यांच्या तक्रारीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे. जखमी असलेल्या स्वरूप कापे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान ही मारामारी अंतर्गत भागिदारी घ्या व्यवसायाच्या देवाणघेवाण वरुन झाल्याची चर्चा सुरु झाली असुन पोलीस लवकरच सत्य बाहेर काढत आहेत.