शेजाऱ्यांच्या ञासाला कंटाळून वडिलांची आत्महत्या मुलीची पोलीसात तक्रार 

 चासनळी खुन व आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील स्वाती दिलीप मिजगुले यांचा खून करुन दिलीप मिजगुले यांनी आत्महत्या केली. माञ माझ्या वडिलांनी आत्महत्या शेजारांच्या ञासाला कंटाळून केल्याची तक्रार गायञी जोशी यांनी पोलीसांकडे केली आहे.

या घटनेची पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चासनळी येथील दिलीप शंकर मिजगुले व त्यांची पत्नी स्वाती दिलीप मिजगुले हे दोघे एकञ राहत होतो. स्वाती ह्या अंगणवाडी सेविका तर दिलीप हे चासनळी येथे चहाची टपरी चालवत होते.

 त्यांच्याच घराशेजारी राहणारे गोरख चौरे, संदीप चौरे व आशा चौरे यांनी आपल्या वडिलांना वारंवार ञास देवून भांडण करीत होते. त्यांच्या सततचा ञास दिल्याने माझ्या वडिलांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची तक्रार मयत दिलीप मिजगुले यांची मुलगी गायञी अजय जोशी रा. पुणतांबा यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.

 गायञी जोशी यांच्या तक्रारीवरून तसेच मयत दिलीप मिजगुले यांनी आत्महत्येपुर्वी  भिंतीवर शेजाऱ्यांनी ञास दिल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहीले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आरोपी गोरख चौरे, संदीप चौरे व आशा चौरे यांना तातडीने ताब्यात घेवून अटक केली आहे.

 आपल्या पत्नीचा खुन करुन  स्वतः गळफास घेवून आत्महत्या करणारे दिलीप मिजगुले यांच्या मृत्यु प्रकरणाला मुलीच्या तक्रारीवरून वेगळेच वळण लागले आहे. ताब्यात घेतलेल्या चौरे यांच्याकडे कसुन चौकशी केल्यानंतर या घटनेतील गुड अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 मयत स्वाती मिजगुले यांच्यावर खुद्द पतीने संशय घेवून खुन केला पण दिलीप मिजगुले यांच्या आत्महत्येला शेजारीच जबाबदार असल्याच्या तक्रारीने चर्चेला उधाण आले आहे.